×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | धक्कादायक ! मित्राच्या पत्नीची अश्लील छायाचित्रे बनवणारा होमगार्ड 'गोत्यात';...

Pune Crime | धक्कादायक ! मित्राच्या पत्नीची अश्लील छायाचित्रे बनवणारा होमगार्ड ‘गोत्यात’; जाणून घ्या प्रकरण

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मित्राच्या पत्निच्या छायाचित्रामध्ये छेडछाड करुन अश्लिल इमेज तयार केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) बारामती तालुक्यात उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन एका होमगार्डला (homeguard) बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) फिर्याद दिली आहे.

 

पोलीस निरीक्षक सुनील महाडिक (Police Inspector Sunil Mahadik) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित विजय हटकर Abhijit Vijay Hatkar (रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो होमगार्ड म्हणून काम करतो. पीडित फिर्यादी महिला हटकर याच्या मित्राची पत्नी (friends wife) आहे. त्यामुळे त्याचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. त्यातूनच त्याची आणि मित्राच्या पत्नीची ओळख झाली होती. त्याने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्यासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील शेरेबाजी (Pune Crime) केली.

एवढ्यावर तो थांबला नाही तर महिलेच्या छायाचित्रात छेडछाड करत अश्लिल इमेज (making obscene photograph) तयार केली.
त्यानंतर त्याने हे फोटो तिच्या मोबाईलवर पाठवले. त्या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे मेसेज पाठवले.
त्यामुळे या महिलेने तात्काळ शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार केली.
पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल (molestation case) करुन तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरु केला.
आरोपीने स्वत:चा मोबाईल फोन बंद ठेवून देखील सायबर सेलच्या (cyber cell) मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली.

ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मागदर्शनाखाली पोलीस हवालदार गोपाळ ओमासे, पोलीस नाईक किरण कदम, अतुल जाधव यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | homeguard arrested making obscene photographs friends wife in baramati of pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Family Pension Rules | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! ‘फॅमिली पेन्शन’ची मर्यादा वाढवली, दरमहा मिळणार ‘एवढी’ रक्कम; जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा

Pune Crime | काय सांगता ! होय, पत्नीनं खोट्या तक्रारी करून नातेवाईकांमध्ये केली ‘बदनामी’; वैतागून पतीची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Rohit R R Patil | दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मुलाला ‘या’ आजीकडून ‘ऑफर’ अन् ‘सल्ला’ (व्हिडिओ)

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News