Pune Crime | हॉटेल ‘गारवा’चे मालक आखाडेंच्या खून प्रकरणातील मुख्य सुत्रधारास लातूर येथून अटक, लोणी काळभोर पोलिसांकडून आतापर्यंत 10 जण गजाआड

पुणे (Pune Crime) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे-सोलापूर रस्त्यावर (Pune-Solapur Highway) असलेल्या हॉटेल गारवामुळे त्याच्या शेजारच्या अशोका हॉटेलचा (Ashoka) व्यवसाय होत नव्हता. त्यामुळे अशोका हॉटेलच्या चालकांनी एका सराईत गुन्हेगाराला सुपारी (Crime) देवून हॉटेल गारवाचे (Hotel Garva) मालक रामदास आखाडे यांचा खून (Ramdas Akhade Murder) केल्याचे लोणी काळभोर पोलिसांनी केलेल्या (Loni Kalbhor Police) तपासात निष्पन्न झाले. खून करण्यासाठी आरोपींना दररोज एक ते दोन हजार रुपये देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी लातूर (Latur) येथून अटक (Arrest) केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक (Pune Crime) करण्यात आली आहे.

Pune-Bangalore Highway | पुणे-बेंगलोर महामार्गावर 3 फूट पाणी, महामार्ग अद्यापही बंदच; 40 तासापासून वाहतूक खोळंबली

रामदास रघुनाथ आखाडे (वय 38, रा. जावजी बुवाची वाडी, ता. दौंड) असे खून झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलस ठाण्यातील (Loni Kalbhor Police Station) पोलीस अधिकाऱ्यांनी बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय 56), निखिल बाळासाहेब खेडेकर (वय 24), सौरभ ऊर्फ चिम्या कैलास चौधरी (वय 21), अक्षय अविनाश दाभाडे (वय 27) करण विजय खडसे (वय 21), प्रथमेश राजेंद्र कोलते (वय 23), गणेश मधुकर माने (वय 20) आणि निखिल मंगेश चौधरी (वय 20, सर्व रा. हवेली) यांनी यापूर्वी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश आरते (Nilesh Aarte) आणि एक विधीसंघर्षीत मुलगा फरार झाले होते.

NCPCR Study | 10 वर्षाची 37.8 % मुले Facebook वर ‘अ‍ॅक्टीव्ह’, 24.3 % मुलांचे Instagram वर अकाऊंट

पाठलाग करुन आरोपींना अटक

मुख्य आरोपी निलेश आरते Nilesh Aarte (वय-23 रा. तुकाई दर्शन, ता. हवेली) हा सराईत गुन्हेगार आहे. पोलिसांच्या पथकाने सात दिवस तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोधत घेतला. पोलिसांच्या पथकाने पुणे, अहमदनगर, बार्शी, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात शोध घेतला. दरम्यान आरोपी लातूर मधील गांधी चौक (Gandhi Chowk, Latur) येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने शनिवारी (दि.24) गांधी चौकात सापळा रचला. पोलिसांची चाहुल लागताच आरोपी दुचाकीवरुन पळून जाऊ लागले. पोलिसांनी 10-12 किलोमीटर पाठलाग करुन मुख्य आरोपी आणि विधीसंघर्षीत मुलाला ताब्यात घेतले.

Ration Card | खुशखबर ! रेशन कार्डधारकांना नोव्हेंबरपर्यंत फ्री ‘रेशन’शिवाय मिळतील अनेक मोठे फायदे, जाणून घ्या

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Additional Commissioner of Police Namdev Chavan), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (Deputy Commissioner of Police Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग कल्याणराव विधाते (Assistant Commissioner of Police Hadapsar Division Kalyanrao Vidhate), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi), पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे (Police Inspector Subhas Kale) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor), दादाराजे पवार (API Dadaraje Pawar), पोलीस उप निरीक्षक अमित गोरे (Police Sub Inspector Amit Gore), पोलीस हवालदार नितीन गायकवाड, गणेश सातपुते, राजु पुणेकर, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, संतोष अंदुरे, संदीप धनवटे, सतीश सायकर, बाजीरावर वीर, निखील पवार, गणेश भास्कर, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंके यांच्या पथकाने केली.

Pimpri Crime | ‘तुला माझ्याबरोबर एक रात्र यावे लागेल’ ! भोसरी पोलिस ठाण्याच्या आवारातच महिलेकडे शरीर सुखाची मागणी

काय आहे प्रकरण

बाळासाहेब खेडेकर व त्याचा मुलगा निखिल यांचे आखाडे यांच्या गारवा हॉटेल शेजारी अशोका नावाचे हॉटेल आहे. आखाडे यांच्या हॉटेलमुळे खेडेकर यांच्या हॉटेलचा व्यवसाय होत नव्हता. त्यामुळे बाळासाहेब खेडेकर याने त्याचा भाचा सौरभ चौधरी याला आखाडे याचा खून करण्यास सांगितले. आखाडे यांचा खून केल्यास तुला दररोज एक ते दोन हजार रुपये देवू असे खुनाच्या दोन महिने आधी खेडेकर बाप-लेकाने चौधरी याला सांगितले होते. त्यानुसार चौधरी याने त्याचा साथीदार नीलेश मधुकर आरते व इतर साथीदारांच्या मदतीने आखाडे यांचा खून केला. रविवारी (ता.18) ते सायंकाळी पावणेसातच्या सुमारास उपाहारगृहासमोर खुर्ची टाकून बसले होते. त्या वेळी हल्लेखोर आणि त्याच्याबरोबर असलेला साथीदार दुचाकीवरून तेथे आले. काही कळायच्या आत एका हल्लेखोराने त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांचा खून केला.

Pune Crime | Hotel Garwa owner arrested in Latur murder case, Loni Kalbhor police

गारवाचा रोजचा दोन ते अडीच लाखांचा व्यवसाय

पुणे-सोलापूर रस्त्यावर (Pune Solapur Highway) अशोका (Hotel Ashoka) व गारवा
(Hotel Garva) हे दोन्ही हॉटेल शेजारी-शेजारी आहे. गारवाचा रोजचा व्यवसाय हा दोन ते अडीच
लाख रुपये तर अशोकाचा व्यवसाय साधारण 50 ते 60 हजार रुपये होते. ज्या-ज्या वेळी हॉटेल
गारवा काही निमित्ताने बंद असते त्या-त्या वेळी अशोकाचा व्यवसाय अडीच ते तीन लाख रुपयांचा
होता. त्यामुळे गारवा हॉटेल कायमचे बंद पडले तर आपला व्यवसाय वाढेल या विचाराने आरोपींनी खुनाचा कट केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. लोणी काळभोर पोलिस (Loni Kalbhor Police) ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक दादाराजे पवार (Police Sub Inspector Dadaraje Pawar) या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Hotel Garwa owner arrested in Latur murder case, Loni Kalbhor police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update