Pune Crime | विश्रांतवाडीत हॉटेल व्यावसायिकाचा घरातच गोळीबार  

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरातच पिस्तुलातून गोळीबार (Firing) केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. संबंधिताने 2016 मध्ये देखील चुकून फायर (Pune Crime) केले होते.

 

सुरेश शंकरराव धापटे Suresh Shankarao Dhapte (वय 42) असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

धापटे हे हॉटेल व्यावसायिक (Hotel Professionals)असून, त्यांचे विश्रांतवाडी परिसरातच रेस्टो अँड बार (Resto and Bar) आहे.
त्यांच्याकडे परवाना असणारे पिस्तूल आहे.  गुरुवारी दुपारी राहत्या घरातच गोळीबार केला.
अचानक झालेल्या  आवाजाने शेजारचे लोक घाबरून गेले.
याघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तपासाला गती दिली. दरम्यान, सुरेश यांच्याकडून 2016 मध्येही  मिस फायर झाले होते.

 

Web Title :- Pune Crime | Hotel owner fired at home in Vishrantwadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune CP Amitabh Gupta | मोक्का कायद्याची प्रभावी अमंलबजावणीने गुंडाना धाक – पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

IPS Officer Rashmi Shukla | फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात खटला चालविण्यास राज्य सरकारचा नकार

Maharashtra IPS Officer Transfer | पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी अंकित गोयल

Maharashtra IPS Officer Transfer | पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी अंकित गोयल तर सोलापुर ग्रामीणच्या अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे, जाणून घ्या इतर 22 अधिकाऱ्यांच्या बदल्या कोठून कोठे झाल्या