Pune Crime | पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ ! शिरुरमधील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’वर भरदिवसा ‘सशस्त्र’ दरोडा; कोट्यावधीचं सोनं आणि रोकड लंपास (CCTV व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  बँक ऑफ महाराष्ट्रवर भरदिवसा दरोडा (robbery in Bank of Maharashtra) टाकण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (Pimperkhed Taluka Shirur) या गावामधील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आज (गुरुवार) दुपारी दीडच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण पुणे (Pune Crime) जिल्ह्यात खळबळ उडाली.

दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत बँकेतून कोट्यावधी रुपयांचे सोने (Gold) आणि रोख रक्कम (cash) लंपास केली आहे.
ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Bank robbery caught in CCTV) झाली आहे.
या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

बँकेवर दरोडा पडल्याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पुणे (Pune) आणि अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar district) सर्व पोलीस स्टेशनला, पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील,
ग्रामसुरक्षा दल आणि नागरिकांना महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे.
दरोडेखोर 25-30 वयोगटातील असल्याचे सांगण्यात (Pune Crime) येत आहे.

 

5-6 दरोडेखोर निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, ग्रे रंगाचे जर्किन, कानटोपी चष्मा व पायात बूट घातले होते.
हे दरोडेखोर सिल्वर रंगाच्या मारुती सियाज (Maruti Siyaj) गाडीतून आले होते.
या गाडीवर ‘प्रेस’ असे लिहिलेले होते. दरोडा टाकल्यानंतर आरोपी नगरच्या दिशेने पळून गेले (Pune Crime) आहेत.

शिंगवे, पारगाव, रांजणी, वळती, भागडी, थोरांदळे आणि इतर गावातील पोलीस पाटील यांना संदेश पाठवून हा संदेश गावातील इतर ग्रुपमध्ये व्हायरल करण्यास सांगितले आहे.
तसेच या वर्णनाची गाडी आणि संशयित मिळून आल्यास किंवा काही माहिती मिळाल्यास तात्काळ मंचर पोलीस स्टेशनला (Manchar Police Station) कळविण्याचे आवाहन केले आहे.
तसेच ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने ही गाडी व इसम पकडून ठेवावेत असे संदेशात नमूद केले आहे.

 

Web Title : Pune Crime | Huge excitement in Pune district! armed robbery on Bank of Maharashtra in Shirur taluka; Billions of gold and cash lamps (CCTV video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | क्रांनीच सोलर व रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीच्या रक्तदान शिबीरात 41 जणांचे रक्तदान

Narayan Rane on CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद कसं मिळालं? ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं, नारायण राणेंनी केला गौप्यस्फोट

Solapur Crime | धक्कादायक ! पत्नीच्या चारित्र्यावर संशय, SRPF जवानाने केलेल्या गोळीबारात एक ठार दोन जखमी