Pune Crime | हम यहा के भाई है म्हणत टोळक्याचा रामटेकडी येथे धुडगुस; तलवार, गुप्तीने वार करुन केले तरुणांना जखमी

पुणे : Pune Crime | रामटेकडी (Ramtekdi, Pune) येथे बोलत असलेल्या तरुणावर मोबाईलच्या बॅटरीची टॉर्च मारुन गुंडाच्या टोळक्याने तलवार, गुप्तीने वार करुन जबर जखमी करुन धुडगुस घातला. याप्रकरणी मनमोहन तिवारी Manmohan Tiwari (वय २४, रा. गोसावी वस्ती, वैदुवाडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४१२/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ६ जणांचे टोळके व त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना रामटेकडी येथील अण्णाभाऊ साठे उद्यानात (Annabhau Sathe Park, Ramtekdi) गुरुवारी सायंकाळी पावणेआठ वाजता घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्याचे नातेवाईक सागर चतुर्वेदी (Sagar Chaturvedi), प्रिन्स गौतम (Prince Gautam), आशिष तिवारी (Ashish Tiwari), संकर्षण तिवारी (Sankarshan Tiwari) व अनुराग तिवारी (Anurag Tiwari) यांच्यासह उद्यानात बोलत होते. त्यावेळी एक टोळके तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या चेहर्‍यावर मोबाईलचे टॉर्चची लाईट मारुन “तुम साले लोग हम पे नजर रख रहे हो क्या, हम यहा के भाई हे, तुमकाे दिखाता हू, हम कौन है” असे म्हणून शिवीगाळ केली. इतर साथीदारांना बोलावून तलवार व गुप्तीसारखे चाकूने आशिष तिवारी याच्या हाता पायावर वार करुन त्याला गंभीर जखमी केले. (Pune Crime)

फिर्यादी यांच्या पाठीवर व हातावर चाकूने वार करुन जखमी केले. त्यांच्यासोबत असलेले संकर्षण तिवारी,
अनुराग तिवारी, प्रिन्स गौतम व आशिष तिवारी यांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतले.
त्यानंतर फिर्यादी यांच्याबरोबर असलेल्या इतर नागरिकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली.
परत जानाता “यहा के भाई हम है, यहा पे हमारा राज चलता है, फिरसे हमारे खिलाफ जाने का नही,
नही तो इधरहीच तुम लागो की समाधी बना देंगे” असे म्हणून अण्णाभाऊ साठे गार्डनच्या भिंतीवरुन उड्या मारुन
निघून गेले. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले
(Sub-Inspector of Police Ajay Bhosale) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Hum yaha ke bhai hai saying the gang at Ramtekdi; Talwar, Gupti stabbed and injured the youth Wanwadi Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nana Patole | ‘नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…’, नाना पटोलेंच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर म्हणाले- ‘या संघाच्या शाखेत’

Shivsena | शिवसेनेकडून अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर प्रश्नांचा भडीमार! प्रकल्प गेल्याचे दुःखही महाराष्ट्राने व्यक्त करू नये का?

Police Suspended | शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार निलंबित