Pune Crime | चिंकारा हरणासह 5 सशांची शिकार ! पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चिंकारा जातीच्या हरणासह (chinkara deer) 5 सशांची शिकार (Rabbit hunting) केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) बारामती तालुक्यातील पणदरे वनपरिक्षेत्रात (Pandare Forest Range) घडला असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी साताऱ्यातील तिघांसह पाच जणांवर वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करुन चौघांना अटक (Arrest) केली आहे.

 

वैभव सुभाष घाडगे (वय-26), संग्राम सुनील माने (वय-27 दोघे रा. सातारा रोड, ता. कोरेगाव जि. सातारा), तर सुनिल मारुती शिंदे (वय-40), दादा रामभाऊ पवार (वय-37 रा. आबाजीनगर, पणदरे) अशी वनविभागाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील पाचवा आरोपी फरार (Pune Crime) झाला आहे.

 

बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर (Shubhangi Lonakar) यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास बारामती वनवपरिक्षेत्रातील कर्मचारी सुभाष पानसांडे, नंदकुमार गायकवाड, जयराम जगताप, सचिन काळे, प्रकाश लोंढे बारामती पणदरे परिक्षेत्रातील गट नं. 435 मध्ये रात्री गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना बॅटऱ्यांच्या हालचाली दिसल्या.

 

कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती वरिष्ठांना देऊन घटनास्थळी छापा टाकला.
त्यावेळी संबंधित पाच आरोपी एक चिंकारा जातीचे हरीण आणि पाच सशांची शिकार करताना रंगेहाथ आढळून आले.
अधिकाऱ्यांची चाहूल लागताच एक आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला.
परंतु चार जणांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. मृत हरणाचे शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा (Viscera) तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

 

Web Title : Pune Crime | hunting five rabbits including deer baramati charges filed against 4 persons pune rural police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा