Pune Crime | ‘फ्लॅट आम्हाला विक नाहीतर तुझे हातपाय तोडू’, महिलेला धमकावणाऱ्या पती-पत्नीवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फ्लॅट (Flat ) साडेसतरा लाख रुपयांना आम्हाला विकून (Selling) इथून निघून जा, नाहीतर तुझे आणि नवऱ्याचे हातपाय तोडू, अशी धमकी (Threat) देऊन एकजण महिलेच्या अंगावर धावून गेला. याप्रकरणी पती – पत्नीच्या (Husband and wife) विरोधात खंडणीचा (Ransom) गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे. हा प्रकार चिंचवड येथे 13 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 च्या सुमारास सागर अपार्टमेंट येथे घडला.

 

अखिल अशोक परब (Akhil Ashoka Parab), प्रणाली अखिल परब Pranali Akhil Parab (रा. सागर अपार्टमेंट 2, सुदर्शन नगर चिंचवड -Sudarshan Nagar Chinchwad) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. याबाबत एका महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद दिली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादंवी कलम 385, 504,506,34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मालकीच्या फ्लॅटच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रितम पाटील (Pritam Patil) या व्यक्तीला घेऊन फिर्यादी गेल्या.
फिर्यादी हे प्रितम पाटील याच्याकडून सागर अपार्टमेंटच्या बाजूच्या बोळातील परिसर स्वच्छ करुन घेत होत्या.
त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले.
अपार्टमेंटच्या बोळीत पडलेला लोखंडी रॉड हातात घेऊन आरोपी अखिल परब हा फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेला.
तू मला तुझा प्लॅट साडेसतरा लाख रुपयांना विकून येथून निघून जा, फ्लॅट मला नाही विकला तर मी तुझ्या नवऱ्याचे व तुझे हातपाय मोडेन आणि तुम्हाला येथे राहून देणार नाही, अशी धमकी देऊन फिर्यादी यांना शिवीगाळ केली.

आरोपी प्रणाली हिने देखील फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
तुला आम्ही साडेसतरा लाख रुपये देतो, तू तुझा फ्लॅट आम्हाला विकून निघून जा, नाही तर आम्ही तुला तुझ्या जागेत पाय पण ठेवू देणार नाही.
तसेच तू आम्हाला तुझा फ्लॅट विकला नाही तर आम्ही तुझ्या व नवऱ्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात वारंवार गुन्हे दाखल करुन त्रास देऊ,
अशी धमकी आरोपी प्रणाली हिने दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलिसांनी आरोपी पती – पत्नीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने (PSI Ganesh Mane) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Pune Crime | husband and wife charged for threatening womanin pimpri chinchwad pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा