Pune Crime | शुल्लक कारणावरून पतीने पत्नीला दिले पेटवून; पोलिसांनी पतीला ठोकल्या बेड्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी येथील नेहरूनगर (Nehru Nagar Pimpri) परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वयंपाक बनवण्यास (Make Cooking) उशीर झाल्याच्या शुल्लक कारणावरून पतीने पत्नीच्या (Wife) अंगावर डिझेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केला. यामध्ये पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करण्यात आला असून पतीला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. बाबू ऊर्फ राहुल विठ्ठल पारधे Babu alias Rahul Vitthal Pardhe (वय -28) असं त्याच नाव आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल पारधे याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर (Character) संशय होता. शनिवारी पीडितेला स्वयंपाक बनवण्यास उशीर झाल्याने राहुलला वेळेवर जेवण मिळाले नाही. त्यामुळे राहुल संतापला. त्याने पीडितेच्या अंगावर डिझेल (Diesel) ओतून तिला पेटवून दिलं आहे. यात पीडिता गंभीर जखमी झाली. (Pune Crime)

 

तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांनी राहुल पारधे याच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
केवळ जेवण बनवण्यास वेळ झाला म्हणून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान पोलिसांनी राहुल पारधेला अटक केली असून त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे.

 

Web Title :- Pune Crime | husband attempt to murder wife by setting her on fire fir lodged accused arrested pimpri chinchwad crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा