Pune Crime | ‘तिनं म्हंटलं मर अन् त्यांनी केलं’, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | लग्नानंतर हुंड्याच्या कारणावरुन किंवा व्यवसायासाठी पैसे आणण्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ केला जात असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सततच्या होणाऱ्या त्रासाला वैतागून विवाहित महिला टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करतात. मात्र, पत्नीच्या त्रासाला (wife trouble) कंटाळून पतीनेच आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) पिंपरी चिचंवड परिसरात घडली आहे. ही घटना जुनी सांगवी (Juni Sangvi) येथील ढोरे नगर येथे 2 ऑक्टोबर रोजी घडली आहे.

 

प्रसाद उमेशराव देशमुख Prasad Umeshrao Deshmukh (वय-34 रा. ढोरे नगर, जुनी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी मयत प्रसादच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi police station) सोमवारी (दि.23) फिर्याद दिली आहे.
आईच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पत्नी, सासू, विशाल राजेंद्र (सर्व रा. सुभाष नगर, येरवडा, पुणे) यांच्या विरोधात 306, 504, 506,34 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा मुलगा प्रसाद याला खोट्या तक्रारीत अडकवण्याची व मुलाचे तोंड पाहू देणार नाही, अशी धमकी दिली.
तसेच तुझ्या नातेवाईकांशी कुठलाही संबंध ठेवू नये, यासाठी दबाव टाकला. तू मर तू मर, असे म्हणून आरोपी पत्नीने त्रास दिला.
शिवीगाळ करुन दमदाटी (Pune Crime) केली. वारंवार होणाऱ्या त्रासाला वैतागून प्रसादने 2 ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वासहा वाजता आत्महत्या
(husband commits suicide) केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के.एस गवारी (PSI K. S. Gawri) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | husband commits suicide due wifes troubles incident happen in pimpri chinchwad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LIC Jeevan Umang | 1302 रुपये प्रीमियम देऊन मिळतील 27.60 लाख रुपये, जाणून घ्या या पॉलिसीबाबत सर्वकाही

Pune Cyber Police | मॅट्रोमोनी साईटवरुन लाखोंचा गंडा घालण्याऱ्या दोन नायजेरियन आरोपींना दिल्लीतून अटक

NCB Officer Sameer Wankhede | आता ‘या’ तक्रारीमुळं समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखी भर