Pune Crime | पत्नीला वेडी ठरवून नेले भोंदुबाबाकडे, त्याने उपचाराच्या बहाण्याने केले अश्लिल चाळे

पुणे : Pune Crime | पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचा छळ केल्यानंतर तिला वेडी ठरवून उपचारासाठी एका भोंदूबाबाकडे नेण्यात आले. या भोंदूबाबाने उपचाराचा बहाणा करुन तिच्याबरोबर अश्लिल चाळे करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Pune Crime) आहे.

याप्रकरणी कोंढव्यात राहणार्‍या एका २४ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली असून त्यावर पोलिसांनी महिलेचा पतीवर अनैसर्गिक अत्याचार, तर सासरे व ४ नणंद यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार व जादुटोणा कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

आसीफ बाबा (वय ७०, रा. युसुफ दर्गासमोर, येरवडा) असे गुन्हा दाखल झालेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. हा प्रकार १४ फेब्रुवारी ते ७ मे २०२१ दरम्यान घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पतीने तिची इच्छा नसताना तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच तिला त्रास देत तिच्या चारित्र्याचा संशय घेत ती वेडी असल्याचे परिसरात पसरविले. त्यावर उपचार करण्यासाठी पतीने तिला येरवडा येथील आसीफ बाबा याच्याकडे घेऊन गेला. उपचाराच्या नावाखाली आसीफ बाबा हा तिला एका खोलीत घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याशी अश्लिल चाळे करीत विनयभंग केला. या प्रकारानंतर ही महिला आपल्या माहेरी परत आल्यानंतर आता तिने फिर्यादी दिली असून कोंढवा पोलिसांनी ४९८ अ, ३७७, ३५४, ५०४, ५०६, सह जादुटोणा अधिनियम २०१३ कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दगडे तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Maharashtra Police Transfer | पुण्यातील पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, मितेश घट्टे, स्वप्ना गोरे यांची बदली; पुणे ग्रामीणचे विवेक पाटील पुणे शहरात

Shivajirao Bhosale Bank | शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फरार कर्ज वसुली अधिकाऱ्याला अटक

ED | शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ यांच्यासह मुलगा आणि जावयाच्या कार्यालये, निवासस्थानावर ईडीचे छापे

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | husband done wrong things with wife

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update