×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | 'बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय कर', पत्नीवर जबरदस्ती; पुढं झालं...

Pune Crime | ‘बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय कर’, पत्नीवर जबरदस्ती; पुढं झालं असं काही

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका महिलेला पतीनेच वेश्या व्यवसाय (Prostitution Business) करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे. हा प्रकार 8 डिसेंबर 2020 ते 16 जानेवारी 2021 या कालावधीत संभाजी चौक, पाषाण (Pashan) याठिकाणी घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि.30) देहू रोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) सासू, सासरे, मामी, मामा, जाऊ, दीर, पती यांच्या विरोधात तक्रार दिली आहेत. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन 8 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीला मधुमेह (Diabetes) असल्याची माहिती लग्न जमवताना मध्यस्थी असलेल्या मामा आणि मामीने लपवून ठेवली. लग्नानंतर पतीच्या मधुमेहाच्या उपचारासाठी (Treatment) माहेराहून पैसे आणण्यासाठी सासू (Mother in Law) – सासऱ्यांनी (Father in Law) महिलेला दमदाटी करुन शिवीगाळ करत मारहाण (Beating) केली. पतीला मधुमेह असल्याची माहिती लपवून का ठेवली अशी विचारणा फिर्यादी महिलेने मामा आणि मामीकडे केले. त्यावेळी मामा, मामी आणि जाऊ यांनी फिर्यादी महिलेस शिवीगाळ केली. तसेच मामी, दीर आणि एका व्यक्तीने फिर्यादीसमोर कमी कपडे घालून तिच्यासमोर गैरवर्तन करत विनयभंग (Molestation Case) केला. (Pune Crime)

आरोपी पतीने मधुमेहाच्या औषधोपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी फिर्यादी यांना पुण्यात वेश्या व्यवसाय चालणाऱ्या बुधवार पेठेत (Budhwar Peth, Pune) नेले. याठिकाणी फिर्यादी यांना वेश्या व्यवसाय कर म्हणून विचारणा केली. फिर्यादी यांनी नकार दिल्याने पतीने घरी आल्यानंतर फिर्यादी यांच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग केला. तसेच महिलेच्या माहेरच्या लोकांनी दिलेले स्त्रीधन परत न करता फिर्यादी महिलेला घरातून हकलून दिले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव (API Jadhav) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | husband forced wife for prostitution business budhwar peth in pimpri chinchwad

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News