Pune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी बघून घेईन’ ! पुण्यात पोलीस हवालदाराची पकडली ‘कॉलर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पतीपत्नीतील भांडण्याची तक्रार देण्यासाठी ते दोघेही हडपसर पोलीस चौकीत आले. दोघांचा रागाचा पारा इतका वाढला होता की ते कोणाचे ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीस हवालदाराचीच त्याने कॉलर पकडून हाताने चापट मारुन मारहाण केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) दोघांना अटक (Pune Crime) केली आहे.

सचिन उद्धव सुर्यवंशी (वय २६, रा. बी. टी. कवडे रोड) व एका २५ वर्षाची महिला अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही पती-पत्नी असल्याची माहिती आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सोमनाथ बनसोडे यांनी फिर्याद दिली आहे. ही रविवारी रात्री दहाच्या सुमारास घटना हडपसर पोलिस चौकीसमोरील रोडवर घडली (Pune Crime) आहे.

आरोपी व्यक्ती व महिला दोघांची भांडणे झाल्याची तक्रार देण्यासाठी हडपसर पोलिस चौकीत आले होते. दोघांकडे चौकशी केली असता, त्यांनी पती-पत्नी असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांच्या समोरच आरोपी व्यक्ती पत्नीला मारहाण करत होता. त्यावेळी कर्मचारी बनसोडे यांनी दोघांना काय असेल ती तक्रार देऊन भांडणे न करण्यास सांगितले होते. त्यावेळी दोघांनी बनसोडे यांनाच धक्काबुक्की करत अपशब्द वापरून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.

Web Titel :- Pune Crime | husband wife matter both are doing wrong things with police, hadapsar police arrested both

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे अश्लिल फोटो केले व्हायरल; जाणून घ्या प्रकरण

Gold Price Today | खूशखबर ! सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या

Pune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील कर्मचारी निलंबित; यापूर्वी त्याच प्रकरणात झाली होती अधिकाऱ्यावर कारवाई