Pune Crime | ह्युंदाई शोरूमच्या गाड्या परस्पर विकून लाखोंची फसवणूक, विमाननगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या कामगारांनीच ह्युंदाई शोरूमला (Hyundai showroom) गंडा घातला असून ग्राहकांच्या नावाने पर्चेस ऑर्डर करून 52 लाख 96 हजारांची फसवणूक (fraud) करण्यात आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसानी (Viman Nagar Police) गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

सनी चंद्रप्रकाश गर्ग (Sunny Chandrprakash Garg) (रा. पिंपळे सौदागर), शिवराज लहू पवार (Shivraj Lahu Pawar) (रा. टिंगरेनगर), दिपराज सिंग ऊर्फ सरदारजी (Dipraj Singh alias Sardarji) (रा. नांदेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ज्योती अलेक्स डिमेलो (Jyoti Alex Dimelo) (वय 30, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर येथे सचिन मित्तल यांचे क्रिशा ऑटोमोटिव्ह नावाचे शोरूम आहे. या शो रूममध्ये ज्योती डिमेलो या जनरल मॅनेजर म्हणून काम करतात. आरोपी सनी आणि शिवराज हे दोघे या शोरूममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करीत होते. तर, दिपराज हा सीएसडी एजंट म्हणून काम करीत होता.

आरोपींनी पाच कारच्या डिलिव्हरीची बनावट पर्चेस ऑर्डर तयार केली. जयदीप दावडा, सचिनकुमार सिंग, आकाश सक्सेना, अनिल गुप्ता यांच्या नावाने ही बनावट पर्चेस ऑर्डर तयार केली. कंपनीची दिशाभूल करून 52 लाख 96 हजार रुपायांची फसवणूक (Pune Crime) केली.

Web Titel :- Pune Crime | Hyundai showroom vehicles sold to each other to defraud millions, incident in Vimannagar area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | विनाकरार वापरात असलेल्या महापालिकेच्या मिळकती ताब्यात घेण्याबाबत सत्ताधार्‍यांचे ‘सबुरी’चे धोरण; एक मिळकत ताब्यात घेण्यावरून सत्ताधार्‍यांची GB त ‘गोची’

Municipal Elections | ‘महाविकास’मध्ये प्रभाग सदस्यीय संख्येवरून अद्याप एकमत नाही?, 3 सदस्यीय प्रभागाच्या बातम्यांमुळे राजकिय वातावरण ‘नरम-गरम’; नगरसेवक व इच्छुकांची धाकधूक मात्र वाढली

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात 192 रूग्ण झाले ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी