Pune Crime | ‘मी पार्थ भाऊंचा मित्र ! पार्थ पवारांचे नाव सांगून थेट पोलिस अधिकाऱ्यावर दबाव, जाणून घ्या प्रकरण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांचे नाव सांगून गुन्ह्याचा तपास (Crime Investigation) करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर (Pune Police Officer) दबाव टाकण्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. गुन्ह्यात खोटी साक्ष व चुकीच्या पद्धतीने तपास करावा, यासाठी राजकीय पक्षाच्या बड्या व्यक्तीच्या नावाचा वापर करुन धमकी (Threat) दिल्याचा हा प्रकार हिंजवडी येथे सोमवारी (दि.28) उघडकीस आला.

 

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नकुल न्यामने API Nakul Nyamne (वय-47) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अश्रफ मर्चंट (Ashraf Merchant) याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अश्रफ मर्चंट याने 22 जानेवारी रोजी फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक नकुल न्यामने यांना फोन केला.
मी पार्थ भाऊंचा मित्र आहे, तुमच्याकडे अमित कलाटेचा (Amit Kalate) विषय आहे का? तुमचा त्या विषयात काय स्टँन्ड आहे,
मी आणि पार्थ पवार यांचे पीए सागर जगताप (PA Sagar Jagtap) कलाटे यांचे खास मित्र आहोत.
तुम्हाला मी सांगतोय ते ऐका, अमितचा काय विषय असेल तो तुम्ही मिटवून घ्या, नाहीतर विषय वरपर्यंत घेऊन जावे लागेल.
राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते उमेश पाटील (Spokesperson Umesh Patil) यांनी ही मला तुम्हाला विचारुन घेयला सांगितले आहे.
असे बोलून आरोपीने फिर्यादी यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

यासंदर्भात तांत्रिक बाबीची पूर्तता केल्यानंतर फिर्यादी यांनी सोमवारी (दि.28) तक्रार दिली.
दाखल असलेल्या गुन्ह्यातील तपासात खोटी साक्ष व चुकीच्या पद्धतीने तपास करावा,
यासाठी राजकीय पक्षाच्या मोठ्या पदावरील नावाचा वापर करुन दबाव टकाल्याचे फिर्यादी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे (API Sagar Kate) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | i am partha friend pressure on police for investigation by naming partha pawar in pimpri chinchwad area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sharad Pawar | साधी राहणी उच्च विचारसरणी ! शरद पवारांचा ‘तो’ फोटो होतोय तुफान व्हायरल

 

Rashmika Mandanna Upcoming Movie | रश्मिका मंदानानं ‘या’ नामवंत अभिनेत्रीकडून हिसकवून घेतली बिग बजेट फिल्म, आगामी चित्रपटात करणार रणबीर कपूर सोबत रोमान्स !

 

MLA Madhuri Misal | खाजगी सोसायट्यांमध्ये शासन आणि महापालिकेच्या निधीतून कामे करण्यास परवानगी मिळावी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार माधुरी मिसाळांनी केली मागणी (Video)