Pune Crime | ‘मी निलेश वाडकरचा मुलगा, मीच जनता वसाहतीमधला भाई’ ! नवनाथ वाडकर, सोनु चव्हाण, आदित्य खंडागळे, सनी पवार यांच्यावर खूनाचा प्रयत्न, विनयभंगाचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जनता वसाहत (Janta Vasahat) परिसरात दोन टोळ्यातील वर्चस्वातून २ वर्षांपूर्वी निलेश वाडकर (Nilesh Wadkar) याचा खून (Murder In Pune) करण्यात आला होता. आता त्या ठिकाणी त्याचा मुलगा भाई बनून दहशत पसरत असल्याचे समोर आले आहे. (Pune Crime)

 

वर्चस्ववादातून एका टोळीने दुसर्‍याच्या घरात शिरुन एकावर कोयत्याने वार करुन महिलेला अश्लिल बोलून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) नवनाथ वाडकर (Navnath Nilesh Wadkar), सोनु चव्हाण (Sonu Chavan), आदित्य खंडागळे (Aditya Khandagle), सनी पवार (Sunny Pawar) (सर्व रा. जनता वसाहत) यांच्यावर खूनाचा प्रयत्न (Attempted murder), विनयभंगाचा गुन्हा (Molestation Case) दाखल केला आहे. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका ४२ वर्षाच्या नागरिकाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश वाडकर या गुंडाचा (Pune Criminals) चॉकलेट सुन्या ऊर्फ सुनिल किशोर डोकेफोडे (Chocolate Sunya alias Sunil Kishor Dokefode) व त्याच्या साथीदारांनी २ वर्षांपूर्वी वर्चस्ववादातून खून केला होता. शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी व त्यांची पत्नी घरी असताना नवनाथ वाडकर हा साथीदारांसह त्यांच्या घरी आला. (Pune Crime)

 

नवनाथ वाडकर याने “तुमच्या मुलाला मी मारुन टाकणार आहे, त्याला भाई बनायचे आहे का ? मी निलेश वाडकरचा मुलगा असून मीच जनता वसाहतीमधला भाई आहे, तुमची लायकी आहे का,” असे बोलला. फिर्यादी यांनी दरवाजा उघडला असता त्याने फिर्यादी यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. फिर्यादी यांनी तो चुकवून पटकन दरवाजा लावून घेतला. तेव्हा वाडकर व त्याच्या साथीदारांनी बाहेर उभ्या असलेल्या मोटारसायकलवर कोयत्याने वार करुन नुकसान केले. त्यांची पत्नी गॅलरीत उभी असताना त्यांना अश्लिल बोलून त्यांचा विनयभंग केला. तेथून जाताना लोकांना उद्देशून शिवीगाळ करत “निघा येथून नाही तर तुमची हालत सुद्धा या गाडीप्रमाणे करेल,” असे बोलून दहशत पसरविली. दत्तवाडी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

वर्चस्ववादातून खून, मुलगा पुन्हाही वडिलांच्या मार्गावर

जनता वसाहतीमध्ये वाडकर आणि सनी चव्हाण यांच्या टोळ्या होत्या. वाडकर हा सनी चव्हाण याचा उजवा हात म्हणून ओळखला जात होता.
चव्हाणनंतर वाडकरच टोळी चालवत होता.
त्याच्या टोळीत जनता वसाहत, धायरी, सिंहगड रोड भागातील मुले होती.
तर चॉकलेट सुन्याची वेगळी टोळी होती. दोघांमध्ये २००७ पासून वैमनस्य होते.
चव्हाण हा आपसातील वाद विसरुन चॉकलेट सुन्याबरोबर समझोता करु असे म्हणत असे.
त्याला वाडकर याचा विरोध होता. पोलिसांवर गोळीबार केल्याच्या गुन्ह्यात वाडकर तुरुंगात गेला होता.
जामीनावर सुटल्यावर वाडकर हा सुन्याचा मागावर होता. वाडकर आपल्या मार्गावर आहे, याची कल्पना सुन्याला आली.
तेव्हा त्याने दोन वर्षांपूर्वी जनता वसाहतीतील गल्ली क्रमांक ३ मध्ये वाडकर आणि त्याच्या साथीदारांना गाठले. वाडकर याच्यावर कोयत्याने वार करुन त्याचा खून केला होता.

 

त्यानंतर फरार झालेल्या चॉकलेट सुन्याला पोलिसांनी कोल्हापूरमधून (Kolhapur) अटक केली होती.
सुन्या याच्याविरुद्ध २९ गुन्हे दाखल आहेत. वर्चस्ववादातून (Bhaigiri) निलेश वाडकर याचा खून झाला.
आता त्याचा मुलगा जनता वसाहतीत आपल्या टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी दहशत पसरवित आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | I am the son of Nilesh Wadkar I am the Bhai of Janata colony Attempted murder molestation case against Navnath Wadkar Sonu Chavan Aditya Khandagale Sunny Pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा