Pune Crime | ‘चेअरमनने किया वैसाही मै करुंगा’ ! सोसायटी चेअरमनविरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी केला विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सोसायटीमधील वादातून चेअरमनविरोधात विनयभंगाची तक्रार दिल्यानंतर सोसायटीमधील एका सदस्याने हा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी फिर्यादीचा पाठलाग करुन तिला हातवारे करुन मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) ४० वर्षाच्या तरुणावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे लुल्लानगरमधील (lulla nagar pune ) एकाच सोसायटीत राहतात. फिर्यादी यांनी सोसायटीच्या चेअरमन यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती. त्यावरुन कोंढवा पोलिसांनी यापूर्वी त्यांच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. जुलै २०२१ मध्ये हा प्रकार घडला होता. त्यानंतर याच सोसायटीमध्ये राहणारा आरोपी याने चेअरमन यांच्या सांगण्यावरुन फिर्यादी यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांचा सतत पाठलाग करुन ‘‘चेअरमनने तुम्हारे साथ जैसे किया वैसाही मै भी करुंगा और तुमको हम सब पागल करके ही होडेंगे’’ असे वारंवार बोलत होता. फिर्यादी यांच्या बिल्डींगच्या खाली उभा राहून फिर्यादीकडे बघून हातवारे करुन ‘‘मी वर येऊन तुला बघून घेतो, तुला मारुन टाकतो,’’ असे इशारे करुन फिर्यादी यांना मानसिक त्रास देत होता. ६ जुलैपासून त्याचा हा प्रकार सुरु होता. शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद (Pune Crime) दिली असून पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | ‘I will do what the chairman did’! Harassment to withdraw complaint against society chairman-molestation case registered in kondhwa police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rayat Shikshan Sanstha | रयत शिक्षण संस्थेत तब्बल 1189 पदांसाठी मेगा भरती; जाणून घ्या सविस्तर

OBC Reservation | ‘पवार कुटुंब राज्यातील ओबीसींचा कर्दनकाळ’, भाजप आमदाराचा घणाघाती आरोप

Ahmednagar News | प्रेरणादायी ! कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलेला तरुणाने दिला आयुष्यभराचा ‘आधार’, अहमदनगर जिल्ह्यातील घटना

Pune Crime | ‘बर्थडे’ पार्टीसाठी 22 वर्षीय तरूणीला तळजाई जंगल परिसरात नेलं, दारू ढोसल्यानंतर युवतीला थंडी जाणवली; तिथंच साईडला झोपवून बलात्कार

Rape Attempt | धक्कादायक ! प्रॅक्टिकलच्या बहाण्याने गुंगीचा पदार्थ देऊन 17 मुलींवर बलात्काराचा प्रयत्न ! 2 शाळेच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल

Hingoli Crime | धक्कादायक ! सुनेला खोलीत कोंडून सासऱ्याचं विकृत कृत्य

LPG Cylinder | मोदी सरकार गॅस सिलेंडरमध्ये करतंय मोठे बदल, देशातील कोट्यावधी लोकांना मिळेल फायदा; जाणून घ्या