Pune Crime | पुण्यात मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान चालविणाऱ्या केंद्राचा पर्दाफाश; ग्रामीण पोलिसांकडून तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. इंदापूर पोलीस (Indapur Police) आणि वैद्यकीय विभागाने (Medical Department) बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचा ( Illegal Gestational Diagnosis Center) पर्दाफाश केला आहे. पोलिसांकडून (Pune Rural Police) कारवाई करण्यात आली असून तिघांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याजवळील मोटार आणि गर्भलिंग निदान यंत्रणा पोलीसांनी जप्त केली आहे.

याप्रकरणी प्रवीण पोपटराव देशमुख (Praveen Popatrao Deshmukh) (वय 32, रा. राजळे, सातारा), तौशिफ अहमद शेख (Toushif Ahmed Shaikh) (वय 20, दोघे रा. राजळे, सातारा) तसेच एका विरोधात इंदापूर पोलिसांनी (Indapur Police Station) गुन्हा दाखल केला आहे. देशमुख एका रोगनिदान केंद्रात तंत्रज्ञ आहे. त्याच्याविरोधात गर्भधारण पूर्व प्रसव, पूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) 1994 च्या सुधारित 2003 कायद्यान्वये गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविले जात असल्याची माहिती इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष खामकर (Dr. Santosh Khamkar) यांना मिळाली. त्यानंतर डॉ. खामकर आणि डॉ. एकनाथ चंदनशिवे (Dr. Eknath Chandanshive), डॉ. श्रीकृष्ण खरमाटे (Dr. Shrikrishna Kharmate), डॉ. अमोल खनावरे (Dr. Amol Khanaware) यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञ आणि पोलिसांच्या पथकाने मोटारीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.

इंदापुर-अकलूज रस्त्यावर (Indapur-Akluj Road) दुचाकीवरून दाम्पत्य आले होते. दाम्पत्य मोटारीत बसले आणि मोटार भरधाव वेगाने निघाली. भांडगाव परिसरात एका ओढ्याजवळ मोटार थांबली. पोलीस आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे पथकही तेथे दाखल झाले. त्यावेळी मोटारीची तपासणी केली असता बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविले जात असल्याचे आढळले. त्यानंतर मोटारचालक शेख, देशमुख तसेच पत्नीची गर्भलिंग निदान चाचणी (Gestational Diagnosis Test) करण्यासाठी आलेल्या एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh), अतिरिक्त अधीक्षक मिलिंद मोहिते (Addl SP Milind Mohite), उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे (DySP Ganesh Ingle) यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्यातील पथकाकडून करण्यात आली.

Web Title : Pune Crime | Illegal Gestational Diagnosis Center in Pune exposed; FIR against three from pune rural indapur police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kidney Racket | बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी रुबी हॉलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट,
इतर 4 सुप्रसिद्ध डॉक्टरांसह 15 जणांवर गुन्हा; प्रचंड खळबळ

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर

 

Weight Loss Tips | जिम-डाएटच्या टेन्शनपासून होईल सुटका, केवळ रोज 15 मिनिटे करा हे काम; आपोआप कमी होईल संपूर्ण शरीराचे वजन