Pune Crime | बेकायदेशीर सावकारी ! 6 लाखाचे 17 लाख दिले तरी आणखी 30 लाखाची मागणी करुन जीवे मारण्याची धमकी; चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात FIR

पुणे : Pune Crime | बेकायदेशीर सावकारी (Illegal moneylenders) करणार्याकडून तरुणाने ६ लाख २५ हजार रुपये घेतल्याच्या बदल्यात आतापर्यंत १७ लाख ३६ हजार रुपये दिले. तरीही आणखी ३० लाख रुपयांची मागणी करुन पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाषाण (Pashan) येथील एका ४२ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chatushrungi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०५/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शंतनु अष्टेकर (Shantanu Ashtekar) (रा. अंजोरको सोसायटी, वीरभद्रनगर, बाणेर) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)
फिर्यादी यांनी शंतनु अष्टेकर (Shantanu Ashtekar) याच्याकडून ऑक्टोबर २०१९ मध्ये ६ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.
त्याच्या बदल्यात व्याज व मुद्दल ( Interest and principal) मिळून त्यांनी आतापर्यंत १७ लाख ३६ हजार रुपये परत केले.
तरी देखिल अष्टेकर त्याच्याकडे आणखी ३० लाख रुपयांची मागणी करुन ते तातडीने देण्यासाठी वारंवार फोन करुन तगादा लावला होता. पैसे दिले नाही तर त्याने फिर्यादी व त्यांचे कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे घाबरुन फिर्यादी यांनी गुन्हे शाखेकडे (Pune Police Crime Branch) धाव घेतली.
पोलिसांनी खंडणीचा गुन्हा (extortion case) दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील (Sub-Inspector of Police Patil) अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Illegal moneylenders! 17 lakhs of 6 lakhs but threatened to kill by demanding another 30 lakhs; FIR at Chatushrungi Police Station
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update