Pune Crime | पुण्यातील म्हाडाच्या ‘प्राईम लोकेशन’ ला असलेल्या जमिनीवर बेकायदा ताबा ! स्वारगेट पोलीस ठाण्यात दोन महिलांसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | स्वारगेट (Swargate) जवळील महर्षीनगर (Maharshi Nagar) येथील म्हाडाच्या Maharashtra Housing And Area Development Authority (MHADA) मालकीच्या जमिनीचा बेकायदा ताबा घेऊन (Illegal Possession Of Mhada Land) खोट्या दस्ताऐवजांच्या आधारे न्यायालयातून बनावट ऑर्डर (Fake Court Order) घेतल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Pune Crime). यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. हा प्रकार 1961 पासून आजवर सुरू होता. अगदी ‘प्राईम लोकेशन’ ला असलेल्या या जागेचा बेकायदा ताबा मारण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. (Cheating Case)

 

साखराभाई इराणी, मोना इराणी (वय ३५), फारेख घडियाली (वय ३७), वैशाली कांबळे (वय ३८ सर्व रा. गुलटेकडी), अली जाफरी (वय ६०), ललित ओसवाल (रा. भवानी पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी म्हाडाचे कार्यकारी अभियंता दिनेश श्रीधर श्रेष्ठ (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, महर्षीनगर येथे सिटी सर्व्हे क्रमांक 558, 1 ते 16, 558 A, 696, 697, 698, 699/1, 699/2 व सर्व्हे नंबर 93 या जागेत हा ताबा मारण्यात आला आहे. महर्षीनगर येथे म्हाडाची ‘पुरंदर’ नावाची इमारत आहे. या इमारती शेजारी हा मोकळा भूखंड असून या भूखंडावर चिंचेची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. (Pune Crime)

या जागेवर बेकायदा ताबा मारण्यात येत असल्याची तक्रार आसपासच्या सोसायटीतील नागरिकांनी म्हाडाकडे केली होती.
याच दरम्यान म्हाडाला देखील ही माहिती मिळाली होती. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी संगणमत करून या जागेचे खोटे दस्तावेज तयार केले या जागेची मालकी आरोपींनी त्या दस्तऐवजांच्या आधारे करून घेतली.
या खोट्या दस्तऐवजांचा वापर करून जागेची मोजणी केली जागेचा ताबा मिळवण्याकरता दिवाणी न्यायालयामध्ये हे खोटे दस्तऐवज सादर केले.
न्यायालयाकडून खोटा आदेश घेऊन पूर्ण जागेवर लोखंडी पत्र्याचे कंपाऊंड बांधले. मुख्य रस्त्यावरून आतमध्ये जाणार्‍या रस्त्याची नासधूस करून न्यायालयाची आणि राज्य शासनाची दिशाभूल तसेच फसवणूक केली.
म्हाडाच्या जागेवर अतिक्रमण केले म्हणून गुन्हा दाखल (Fraud Case) करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता दिनेश श्रेष्ठ यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Pune Crime | Illegal possession of land at MHADAs prime location in Pune A case has been registered against six persons including two women at Swargate police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा