Pune Crime | मुळा-मुठा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा, 2 वाळू माफियांच्या विरोधात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हवेली तालुक्यातील (Haveli taluka) मुळा मुठा नदीपात्रातील अष्टापूर ते हिंगणगाव या दरम्यान वाळू माफियांनी (Sand Mafia) बेकायदा वाळू उपसा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हवेली तहसील कार्यालयातील (Haveli Tehsil Office) भरारी पथकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर दोन वाळू माफियांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे. नामदेव सुखदेव कोतवाल (Namdev Sukhdev Kotwal), सचिन गोरख थोरात Sachin Gorakh Thorat (रा. अष्टापूर) यांच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी नूरजहाँ सैय्यद (Divisional Officer Noor Jahan Sayyed) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी कोतवाल आणि थोरात यांनी हवेली तालुक्यातील मुळा – मुठा नदीपात्रातील अष्टापुर (Ashtapur) ते हिंगणगाव (Hingangaon) दरम्यान बेकायदा वाळू उपसा केला. आरोपींनी नदी पात्रातून तीन लाख रुपयांची वाळू चोरली. (Pune Crime)

 

तहसील कार्यालयातील भरारी पथकाच्या लक्षात वाळू चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी तक्रार देण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार ठाणगे (Police constable Thanage) करत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Illegal sand extraction from Mula Mutha river FIR against 2 sand mafias

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा