Pune Crime | कारमध्ये गावठी दारुचा बेकायदा साठा, महिलेसह दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरात आणि कारमध्ये गावठी दारुचा (Liquor) बेकायदेशीरपणे साठा करणाऱ्या एका महिलेसह दोघांना राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने (State Excise) अटक (Pune Crime) केली. दारुचे 60 प्लॅस्टिक कॅन असा एकूण अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) बावधन बुद्रुक (Bavadhan Budruk) येथे गुरुवारी (दि.5) करण्यात आली.

विवेक मुकुटसिंग रजपूत (वय-41 रा. बावधन बुद्रुक), बिंदीया अनिल राजपुत (वय-46 रा. बावधन बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस.जे. डेरे (State Excise Department Inspector S.J. Dere) यांनी फिर्याद दिली आहे.

गटारी आमावस्याच्या पार्श्वभूमीवर अवैध गावठी दारुचा बेकायदेशीरपणे साठा केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, गुरुवारी पथकाने बावधन बुद्रुक येथील त्रिशा बंगल्यावर छापा टाकला. त्यावेळी बंगल्यामध्ये 35 लिटरचे 30 कॅन, तर बंगल्याच्या आवारतच पार्किंग केलेल्या सँट्रो कारमध्ये (एमएच 14 एक्स 7444) प्लॅस्टिकचे 10 कॅन असा एकूण 1 लाख 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, बावधन बुद्रुक येथील भुंडे वस्ती परिसरातील बिंदीया राजपुत हिच्याही घरावर पथकाने छापा घातला. घरातून 15 कॅन व अल्टो कारमधून (एमएच 12 एलजे 1279) 5 कॅन असा एकूण 1 लाख 22 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

File photo

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे (Divisional Deputy Commissioner of State Excise Prasad Surve),
अधीक्षक संतोष झगडे (Superintendent Santosh Zagde),
उपअधीक्षक संजय आर. पाटील (Deputy Superintendent Sanjay R. Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय डेरे, निरीक्षक राजाराम शेवाळे,
उपनिरीक्षक तानाजी शिंदे, गणेश केंद्रे, रोहिदास मासाळकर, समीर पडवळ, दत्तात्रय पिलावरे, शरद भोर,
वाहनचालक दत्तात्रय आबनावे, निलम पिंगळे, शाईन इनामदार, शामल धुमक यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Illegal stock of liquor in car, two arrested along with woman

Pune Bhusar Market | पुण्याच्या भुसार बाजारात आता 5 ठिकाणी ‘पे अँड पार्क’

Lalbaugcha Raja  | गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट!
भक्तांनी लालबागच्या राजाचे दर्शन आणि पूजा ऑनलाइन करण्याचे आवाहन

Pregnancy | प्रेग्नंसीत ‘हे’ पदार्थ खाल्ल्याने मुल गोरे होते का? या काळात सेक्स करावा का?
जाणून घ्या काय म्हणतात एक्सपर्ट