Pune Crime | अनैतिक संबंध ! आमच्या जागेत लफडे करता ? सुरक्षा रक्षकाचा खून करणार्‍या चौघांना कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आमच्या जागेत येऊन लफडे करता असे म्हणून रिक्षाचालक व सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करुन सुरक्षारक्षकाचा खून (Pune Crime) करणार्‍या चौघांना कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) अटक केली आहे.

 

ऋषीकेश राजेश गायकवाड (वय २३, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), किशोर भागवत गायकवाड (वय २९, रा. खडी मशीन चौक) जुबेर पापा इनामदार (वय ३७, रा. इनामदार वाडा, कोंढवा) आणि अमीन मुसा पानसरे (वय २३, रा. चांदतारा चौक, कोंढवा) अशी अटक (Pune Crime) केलेल्यांची नावे आहेत.

 

रवी कचरु नागदिवे (वय ५०, रा. उरुळी देवाची) या सुरक्षारक्षकाचा खून झाला होता. तर, रिक्षाचालक बालाजी भिमा चव्हाण (वय ३५, रा. पीर वस्ती, वडकीगाव) हे जबर जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी नागदिवे यांच्या ओळखीची एक महिला येवलेवाडी येथील डोंगराजवळच्या एका घरात रहाते.
त्यावरुन त्या ठिकाणी प्लॉटिंगचे काम करणार्‍या आरोपींनी हे आपल्या जागेत अनैतिक संबंधासाठी (immoral relationship) येत असल्याचा समज करुन घेतला होता.
त्यावरुन रवी नागदिवे याला सोमवारी फोन करुन बोलावून घेतले होते. बालाजीच्या रिक्षातून रवी तेथे गेला.

तेव्हा “तुम्ही आमचे जागेत लफडे करण्यासाठी येता बाहेरुन बाया घेऊन येता आणि येथे लफडे करता तुम्हाला आता सोडणार नाही,”
से म्हणून त्यांनी दोघांना लाकडी बांबुने डोक्यात, हातापायावर बेदम मारहाण (Pune Crime) केली. त्यात रवी नागदिवे याचा मृत्यु झाला.
त्यानंतर त्यांनी बालाजीच्या रिक्षात दोघांना घालून उंड्री चौकात आणले. तेथे रिक्षात दोघांना तसेच सोडून ते पळून गेले.
त्यानंतर या दोघांना रुग्णालयात नेले असताना रवी नागदिवे याचा मृत्यु झाला. बालाजी चव्हाण यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत (Police Inspector Gakul Raut) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Immoral relationship in our space? Pune Kondhwa police arrest four for killing security guard Kondhwa police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gautam Gambhir | माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला ‘इसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी

Cryptocurrency Bill 2021 | भारतात सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध ! मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर करणार क्रिप्टोकरन्सीसह 26 बिले (विधेयके)

Pune Crime | गोयल गंगा ग्रुपचे अतुल गोयल व अमित गोयल यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल, बनावट खरेदी खताद्वारे SRA प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न