Pune Crime | प्रेमविवाहानंतर आणखी 2 ते 3 महिलांशी अनैतिक संबंध! पुण्यात पोलीस कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल, पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : Pune Crime | प्रेमविवाहानंतर आणखी दोन ते तीन महिलांशी अनैतिक संबंध ठेवून मारहाण करुन तीन मुलांना घेऊन जाऊन वार्‍यावर सोडल्याने पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police) एका पोलीस कर्मचार्‍यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला (Pune Crime) आहे.

राजकुमार तात्याबा शिंदे Rajkumar Tatyaba Shinde (वय ४२, रा. हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस नाईक याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी व आरोपी राजकुमार शिंदे यांचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. त्यावेळी त्याने फिर्यादीच्या संमतीविना जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. लग्नानंतरही आरोपीचे बाहेरील दोन ते तीन महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचे फिर्यादी यांना समजले. त्याची विचारपूस केल्यावर त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यानंतर राजकुमार शिंदे याने राहत्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य तसेच दोन मुली व लहान मुलगा यांना घेऊन कोठेतरी निघून गेला. फिर्यादी यांना एकटे सोडून दिले. फिर्यादी याने आरोपीला वारंवार फोन केला तरी त्याने उचलला नाही. त्यामुळे मानसिक तणावात फिर्यादी यांनी स्वारगेट पोलीस वसाहतीतील राहत्या घरी २१ सप्टेंबर रोजी घरातील फरशी साफ करण्याचे फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या फिर्यादी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. खडक पोलिसांनी गुन्हा (Pune Crime) दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune Crime | ह्युंदाई शोरूमच्या गाड्या परस्पर विकून लाखोंची फसवणूक, विमाननगर परिसरातील घटना

Municipal Elections | ‘महाविकास’मध्ये प्रभाग सदस्यीय संख्येवरून अद्याप एकमत नाही?, 3 सदस्यीय प्रभागाच्या बातम्यांमुळे राजकिय वातावरण ‘नरम-गरम’; नगरसेवक व इच्छुकांची धाकधूक मात्र वाढली

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Immoral relationship with 2 to 3 more women after love marriage! Filed a case against a police officer in Pune, wife attempted suicide

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update