Pune Crime | तुम्ही PhonePe वर पेमेंट स्वीकारता तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी; पुण्यात तिघा सराफांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आता अगदी 10 रुपयांचा चहा पिला तरी त्याचे पैसे गुगल पे (Google Pay), फोन पे (PhonePe) अशा अ‍ॅपवरुन दिले (UPI Payments) जात आहे. त्याबरोबर मोठमोठ्या रक्कमांचे पेमेंट या अ‍ॅपवरुन केले जात आहे. थेट बँकेत पैसे जमा होत असल्याने दुकानदारही अशा प्रकारे पेमेंट जमा करण्याला प्रोत्साहन देत आहे. मात्र, आता त्याचा चोरटे गैरफायदा उठवू लागले आहेत. या चोरट्याने सराफाचा विश्वास संपादन करुन सोन्याची अंगठी खरेदी केली व ऑनलाईन फोन पेवर पेमेंट केल्याचे भासवून फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातील ३ सराफांना त्याने गंडा घातला आहे. (Pune Crime)

 

या प्रकरणी एका 55 वर्षाच्या सराफाने (Goldsmith) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी (Pune Police) आकाश जगताप असे नाव असलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आंबेगाव पठार (Ambegaon Pathar) येथील नेहा ज्वेलर्समध्ये (Neha Jewellers) २८ जानेवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आंबेगाव पठार येथे नेहा ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात आकाश जगताप हा आला. त्याने सोन्याची अंगठी खरेदी करायची असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्याने 25 हजार 500 रुपयांची 5 ग्रॅम 40 मिली ग्रॅम वजनाची अंगठी पसंत केली. मोबाईलवरील मेसेज दाखवून त्या अंगठीचे पेमेंट ऑनलाईन (Online Payment) फोन पे अ‍ॅपद्वारे केल्याचे फिर्यादीला भासविले. मात्र, प्रत्यक्षात त्याने कोणत्याही प्रकारे पैसे न देता सोन्याची अंगठीचा अपहार करुन फियार्दीची फसवणूक (Fraud Case) केली. हे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावरुन गुन्हा दखल करण्यात आला आहे.

 

 

अशाच प्रकारे वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथील श्री वासलीया ज्वेलर्समध्ये (Shree Vasalia Jewelers) हा चोरटा आला. त्याने 8 ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या खरेदी केल्या. त्याचे 52 हजार रुपयांचे पेमेंट त्याने ऑनलाईन सेंड केल्याचा बनावट मेसेज दाखवून सराफाची फसवणूक केली. हा प्रकार 12 फेब्रुवारी रोजी घडला होता.

 

तिसरी घटना वानवडीतील (Wanwadi) केदारीनगर (Kedari Nagar) येथील इकु ज्वेलर्समध्ये 6 जानेवारी रोजी घडली होती.
चोरट्याने 5 ग्रॅम 130 मिलीग्रॅमची अंगठी खरेदी केली. त्याची किंमत 27 हजार 810 रुपये होत असताना
त्याने 28 हजार 700 रुपये ऑनलाईन फोन पेद्वारे पेमेंट केल्याचे फिर्यादीला भासवून त्यांची फसवणूक केली होती.

 

Web Title :- Pune Crime | Important news for you if you accept payment on PhonePe; Three goldsmiths cheated in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा