Pune Crime | विश्रांतवाडीत पूर्वीच्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार, 6 सराईत गुन्हेगारांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पूर्वी झालेल्या भांडणातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने आणि बंबूने वार करुन गंभीर जखमी (Seriously Injured) केले. ही घटना (Pune Crime) बुधवारी (दि.23) दुपारी तीनच्या सुमारास विश्रांतवाडी येथील वाल्मिकी नगर (Valmiki Nagar Vishrantwadi) येथे घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार (Pune Criminals) आहेत.

 

फराण शकील शेख (वय-21 रा. सायप्रस लाईन, खडकी बाजार) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi police station) फिर्याद दिली आहे. सैफ उर्फ अरबाज शेख (वय-24), विनीत भालेराव (वय-23), अर्थव माने (वय-22), प्रसाद कांबळे (वय-23), सुनील झेडे (वय-21), ओसामा कुरेशी (वय-19 सर्व रा. फुलेनगर, येरवडा) असे गुन्हा दाखल झालेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.(Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पूर्वी वाद झाले होते. तसेच मंगळवारी (दि. 22) वाद झाले होते.
बुधवारी दुपारी फराण हा त्याचा मित्र साहिल याच्या घराजवळ कबुतरांना गहू देण्यासाठी गेला होता.
आरोपींनी पूर्वीच्या वादातून फराण याच्यावर कोयता आणि बांबुने हल्ला केला.
ते दोघे झोपडपट्टीत पळून जात असताना आरोपींनी फराण शेख याचा पाठलाग करुन त्याच्यावर कोयत्याने वार करुन जखमी केले.
पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | In a previous altercation at Vishrantwadi, a youth was stabbed with a scythe, FIR was lodged against 6 criminals

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Parambir Singh | राज्य सरकारला ‘सुप्रीम’ झटका ! परमबीर सिंह यांच्याविरुद्धचे सर्व प्रकरणे CBI कडे, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

 

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘तो’ फोटो केला ट्विट, राज्याच्या राजकारणात खळबळ

 

CM Uddhav Thackeray | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून ज्येष्ठ मंत्र्यांचा काढता पाय; मुख्यमंत्री ठाकरेंची मार्मिक शब्दात टिप्पणी