Pune Crime | सासरच्यांनी केलेल्या मारहाणीत विवाहितेच्या वडिलांचा मृत्यू, चौघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सासरच्यांकडून विवाहितेला मारहाण (Beating) केली जात असताना भांडण सोडवण्यासाठी विवाहितेचे वडील गेले. त्यावेळी सासरच्यांनी केलेल्या मारहाणीत विवाहितेच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू (Pune Crime) झाल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.16) सकाळी सातच्या सुमारास थेरगाव (Thergaon) येथील जय मल्हार नगर येथे घडली. याप्रकरणी चौघांना अटक (Arrest) केली आहे.

 

शिवाजी बाबुराव पाडुळे Shivaji Baburao Padule (वय-65 रा. जय मल्हार कॉलनी, थेरगाव) असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. याबाबत त्यांच्या मुलीने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजिनाथ आप्पा धर्मे, सुमन आप्पा धर्मे, रंजना बाळासाहेब पाडुळे, संपत बाळासाहेब पाडुळे, मंगेश बाळासाहेब पाडुळे, रेश्मा संपत पाडुळे यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपी अजिनाथ, सुमन, रंजना आणि मंगेश या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण रतन धर्मे यांना लग्न झाल्यापासून आरोपींनी किरकोळ कारणावरुन शारीरिक व मानसिक त्रास (Mental Distress) दिला.
आरोपींनी फिर्यादीच्या बहिणीला मारहाण केली.
सुमन धर्मे हिने लोखंडी रॉड डोक्यात मारला. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचे आई – वडील गेले.
फिर्यादी यांच्या वडिलांची हृदयाची शस्त्रक्रिया (Heart Surgery) झाली असल्याचे माहित असतानाही आरोपींनी त्यांना मारहाण केली.
त्यात फिर्यादीच्या वडिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक दीपक कादबाने (PSI Deepak Kadbane) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | in beating death of married wamans father crime news in thergaon

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा