Pune : वर्षभरापुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून एकाच कुटुंबातील 6 जणांना बेदम मारहाण, भवानी पेठेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एक वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने एका कुटुंबातील 6 जणांना बेदम मारहाण करत टेम्पोची तोडफोड केल्याचा प्रकार खडक परिसरात घडला आहे. 9 जणांच्या टोळक्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी अश्विनी साळुंखे (वय 32, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आर्म ऍक्ट, जबर मारहाण तसेच इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या काशेवाडी परिसरात राहतात. दरम्यान एक वर्षांपूर्वी फिर्यादी यांच्या भाच्याच यातील एका आरोपीसोबत वाद झाला होता. त्यावेळी याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यावरून एका आरोपीने प्रथम फिर्यादी यांच्या दिरावर लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. तर भाच्याला व इतर दोघांना इतर आरोपींनी लाकडी दंडुक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांची सासू, फिर्यादी व इतर एका महिलेला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. गुन्हा दाखल करत पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.