Pune Crime | भवानी पेठेत पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार हत्याराने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सराईत गुन्हेगार (Pune Criminals) आणि त्याच्या साथिदारांनी धारदार हत्याराने सपासप वार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. ही घटना भवानी पेठेतील (Bhawani Peth) जुना मोटर स्टँड परिसरात घडली असून या (Pune Crime) प्रकरणी पोलिसांनी (Pune Police) 8 जणांना अटक केली आहे.

 

या घटनेत अहमद शेख (वय – 28 रा. कुर्ला, मुंबई) हा गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रेहान बागवान, रशीद कुरेशी, आरिफ शेख, मुख्तार पठाण, अल्ताफ शेख, वाहिद कुरेशी, बिलाल सय्यद, सोहेल पटेल (सर्व रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांना अटक (Arrest) केली आहे. जखमी अहमद शेख याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमद आणि आरोपीमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.
मंगळवारी मध्यरात्री जुना मोटर स्टँड (Old Motor Stand) परिसरात अहमद आणि त्याचे मित्र गप्पा मारत थांबले होते.
त्यावेळी सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथिदारांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आहे.
त्यांनी कोयत्याने वार करुन परिसरात गोंधळ घालून दहशत माजवली.

 

घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन आठ जणांना अटक केली.
फिर्यादी आणि आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर याआधी गुन्हे (FIR) दाखल झाले आहेत.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे (PSI Prahlad Dongle) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | In Bhawani Peth, a young man was stabbed with a sharp weapon out of prior enmity

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा