Pune Crime | पुण्याच्या चंदननगरमध्ये वडिलांसोबत वाद घालणार्‍याला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कामाच्या ठिकाणी वडिलांसोबत वाद घालणाऱ्या एकाचे अपहरणकरून त्याला नदीपात्रात निर्जनस्थळी नेत बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील चंदननगर परिसरात (Chandannagar, Pune) ही घटना घडली (Crime) आहे.

याप्रकरणी धर्मेश चंद्रमा चौहान (वय 27) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शैलेश मोरे, संतोष त्रिंबक जोगदंड आणि त्यांच्या 5 साथीदारांवर चंदननगर पोलिस ठाण्यात (Chandannagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आणि शैलेश मोरे याचे वडील सुनील मोरे हे एकाच कंपनीत नोकरीस आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये कंपनीत किरकोळ कारणावरून वाद झाले होते. त्यानंतर हे वाद मिटले होते. मात्र वडिलांसोबत भांडण केल्याच्या रागातून शैलेश मोरे व साथीदारांनी धर्मेश यांचे दुचाकीवर बसवून जबरदस्तीने अपहरण केले. त्यानंतर वडगावशेरी येथील नदीपत्राच्या कडेला एका निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी आणखी तिघा साथीदारांना बोलावले आणि फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर झाला प्रकाराबाबत पोलिसात कंप्लेंट दिली तर जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर फिर्यादीला परत वापस आणून सोडून दिले. त्यानंतर त्यांनी चंदननगर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.
गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी आणि इतर फरार आहेत.
अधिक तपास चंदननगर पोलीस (Chandannagar Police) करत आहेत.

Web Title :  Pune Crime | In Chandannagar, Pune, a man who was arguing with his father was beaten to death

Pandharpur Wari 2021 : संत ज्ञानेश्वर,
संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ

pandharpur ashadhi ekadashi 2021 update :
महापूजेसाठी फक्त ठाकरे कुटुंबाला प्रवेश; मुख्यमंत्र्यांसमवेत ‘या’ दाम्पत्याला मिळणार महापूजेचा मान

Instant Sugar Control | इन्स्टंट शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज इतक्या प्रमाणात प्या भेंडीचे पाणी