Pune Crime | कात्रज परिसरात महिलेसह तरुणाची एकाच घरात गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : Pune Crime | कात्रज भागात एका महिलेसह तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. बरखा मंडल (वय ३२) आणि राजू फारुख शेख (वय ३१, रा. सीताश्री निवास, संतोषनगर, कात्रज) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाड्याने कात्रज येथे खोली घेतली होती. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरखा ही मुळची पश्चिम बंगालची आहे.
तर, राजू हा पुण्यातील राहणारा आहे. बरखा हिची मुले व पती पश्चिम बंगालमध्ये असतात.
बुधवार पेठेतील कुंठणखान्यात बरखा आणि राजू यांची ओळख झाली.
त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते कात्रज येथे भाड्याने खोली घेऊन रहात होते.
दिवसभर त्यांचा दरवाजा उघडला न गेल्याने बाजूला राहणार्‍यांना शंका आली़ त्यांनी पोलिसांना याची माहिती कळविली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे (Bharti Vidyapeeth Police Station) पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी दरवाजा उघडून पाहणी केली. त्यात राजू याने हॉलमध्ये तर बरखा हिने किचनमध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.

Web Title :-Pune Crime | In Katraj area, a woman and a young man committed suicide by hanging themselves in the same house, a lot of excitement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Immune System In Summer | ‘हे’ 5 फूड उन्हाळ्यात इम्युनिटी करू शकतात कमजोर, डाएटमधून आजच काढा बाहेर; जाणून घ्या

Body Hydration Tips | ‘या’ ऋतूमध्ये शरीराच्या हायड्रेशनवर विशेष लक्ष ठेवा, ‘या’ गोष्टींचं सेवन फायदेशीर; जाणून घ्या