×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | कात्रज परिसरात सराईत गुन्हेगाराकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार; मनगटापासून...

Pune Crime | कात्रज परिसरात सराईत गुन्हेगाराकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार; मनगटापासून हात तोडणाऱ्या 4 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | व्याजाने घेतलेले पैसे (Interest Money) व व्याज परत करण्यावरुन आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर चार जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वार करुन मनगटापासून हात तोडल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन आरोपींना अटक केली आहे. बाबाहरी गोरख सोनावणे (Babahari Gorakh Sonawane), विशाल गोरख सोनावणे (Vishal Gorakh Sonawane), सचिन सिताराम शिंदे (Sachin Sitaram Shinde), सिद्धार्थ श्रीमंत ओव्हाळ (Siddharth Shrimant Oval) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिसांनी (Pune Police) आरोपींविरुद्ध IPC 307,34, आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) 4,5, मपोका 37(1) (3), 135 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

तय्यब शेख (Tayyab Sheikh) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत 53 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाबाहरी गोरख सोनावणे (वय – 33), विशाल गोरख सोनावणे (वय – 31 दोघे रा.शनि मंदिराजवळ), सचिन सिताराम शिंदे (वय – 26 रा.आंबेगाव खुर्द), सिद्धार्थ श्रीमंत ओव्हाळ (वय – 19 रा. जांभुळवाडी रोड, पुणे, आंबेगाव – Ambegaon) यांना अटक केली असून बाबाहरी सोनवणे आणि विशाल सोनावणे हे सराईत गुन्हेगार (Criminals) आहेत. हा प्रकार शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कात्रज चौकातील (Katraj Chowk) दत्तनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मुलगा तय्यब यांनी आरोपी बाबाहरी सोनावणे याच्याकडून 15 हजार रुपये घेतले होते.
आरोपींनी तय्यब याच्याकडे मुद्दल आणि व्याज असे एकूण 70 हजार रुपये मागितले.
तसेच बाबाहरी आणि विशाल सोनावणे यांची तय्यब याच्यासोबत पूर्वी वाद (Disputes) झाले होते.
याचा राग आरोपींच्या मनात होता. पैशाच्या कारणावरून आरोपींनी तय्यब याच्या डोक्यात, डाव्या हाताच्या पंजाजवळ वार करुन मनगटापासून हात तोडून व उजव्या हातावर वार करुन गंभीर जखमी (Seriously Injured) केले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घावटे (API Ghavte) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | In Katraj area a young man was stabbed by a criminal bharti vidyapeeth police arrest 4

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Must Read
Related News