Pune Crime | कोंढव्यात टोळक्याकडून 2 तरुणांवर कोयत्याने वार, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – खर्चासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या तरुणांवर एकाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. पुणे शहरातील (Pune Crime) कोंढवा खुर्द परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa police) एकाला अटक (Arrest) केली आहे. ही घटना शनिवारी (दि.24) मध्यरात्री बाराच्या सुमारास कोंढवा खुर्द येथील वैकुंठ स्मशानभूमी (vaikunth smashan bhumi) परिसरात घडली.

कोंढवा पोलिसांनी शुभम रामभाऊ टिकोळे Shubham Rambhau Tikole (वय-25 रा. कुंजीरवाडा, कोंढवा) याला अटक केली आहे. तर आकाश उणेचा व त्याच्या इतर दोन साथिदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गणेश शहादेव घुगे Ganesh Ghuge (वय-21 रा. कोंढवा) याने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश घुगे याचा मित्र संतोष परदेशी याच्याकडे आकाश उणेचा
याने खर्चासाठी पैशांची मागणी केली होती. परदेशी याने पैसे देण्यास नकार दिला होता. याचा राग
मनात ठेवून आरोपी आकाश आणि त्याच्या इतर साथिदारांनी परदेशी याला लाथा बुक्क्यांनी
मारहाण करत शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी गणेश हा मित्राला सोडवण्यासाठी गेला. त्यावेळी
आरोपी आकाशने गणेशच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवेमारण्याचा प्रयत्न केला. तसेच संतोष
परदेशी याच्यावर देखील वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बर्गे
(Assistant Police Inspector Barge) करित आहेत.

हे देखील वाचा

Pune News | स्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ म्हणजे भाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी

Ration Card | खुशखबर ! रेशन कार्डधारकांना नोव्हेंबरपर्यंत फ्री ‘रेशन’शिवाय मिळतील अनेक मोठे फायदे, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  pune crime | In Kondhwa, 2 youths were stabbed by group of youth, police arrest one in assaults case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update