Pune Crime | पुण्याच्या कोंढव्यात पतीनं 21 वर्षीय पत्नीला 50 वर्षीय व्यक्तीसोबत रंगेहाथ पकडले, पुढं झालं असं काही…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | आपली पत्नी ही बाहेर कोणाला तरी भेटायला जाते, पतीला तिच्या चारित्र्याविषयी संशय होता़ त्यामुळे त्याने तिचा पाठलाग केला. तेव्हा एका 50 वर्षाच्या व्यक्तीबरोबर आपली 21 वर्षाची पत्नी जात असल्याचे त्याला आढळून आले. त्याने दोघांना रंगेहाथ पकडले. त्याचा राग येऊन दोघांनी मिळून पतीला हाताने व दगडाने मारहाण करुन जखमी (Pune Crime) केले.

हा प्रकार कोंढव्यातील एका सोसायटीसमोर मंगळवारी साडेचार वाजता घडला.
याप्रकरणी कोंढव्यात राहणार्‍या 31 वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी 50 वर्षीय व्यक्तीसह महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी तिच्या परिचयाच्या 50 वर्षीय व्यक्तीला भेटायला गेली होती.
त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांचा पाठलाग करुन त्या दोघांना कोंढव्यातील एका सोसायटीसमोर अडवले.
पत्नी व 50 वर्षीय व्यक्तीला तुम्ही दोघे कुठे जाता, असे विचारले.
याचा राग येऊन पत्नीने फिर्यादीला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
50 वर्षीय व्यक्तीने दगडाने मारहाण करुन जखमी केले.
कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title : Pune Crime | In Kondhwa, Pune, a husband saw his 21 year old wife going with a 50 year old man

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत जबरदस्त घसरणीने ग्राहक खुश ! आता 27820 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या नवीन दर

Pune Corporation Election | आगामी महापालिका सभागृहात दिसणार 70 टक्के नवीन चेहेरे !

Trojan Triada Virus | अलर्ट! गुगल प्ले स्टोअरवर बनावट WhatsApp, चुकूनही करू नका डाऊनलोड; अन्यथा…