Pune Crime | कोथरूड परिसरात तडीपार गुंडानं तरूणावर वार करून 25 हजार लुटले, पोलिसांकडून अटक

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | कोथरुड परिसरात (Kothrud Area) तडीपार गुंडाने भलताच राडा घालत एका तरुणावर साथीदारांच्या मदतीने वारकरून 25 हजार रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. पसार झालेल्या या तडीपार गुंडाला कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) दुसऱ्याच दिवशी सापळा रचून अटक (Pune Crime) केली आहे.

प्रवीण उर्फ पऱ्या तुकाराम कुडले (वय 30, रा. सुतारदरा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
तर त्याच्या तीन साथीदारांवर कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपक कोकरे यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण कुडले पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर गंभीर 7 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान त्याला गेल्या वर्षी दोन वर्षांसाठी तडीपार केले होते.
त्यानंतरही तो सुतारदरा परिसरात आला होता. त्याने व त्याच्या साथीदारांनी दोन दिवसांपूर्वी रात्री दीपक यांना अडवत त्यांच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
तर त्याच्या खिशातील 25 हजार रुपये चोरून नेले.
चौघेही पसार झाल्यानंतर तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान माहिती मिळताच येथे पोलीसानी धाव घेतली आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला होता.

दरम्यान, दोन वर्षांसाठी तडीपार गुंडाने पुन्हा हद्दीत येऊन राडा घातल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. तर पोलिसांच्या कामगिरीवर आणि त्यांच्या तडीपारीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.
याच दरम्यान पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी (Police Sub Inspector Ratikant Koli) यांना कुडलेबाबत माहिती मिळाली.
त्यानुसार कोळी, कर्मचारी पटेल व डोलनर यांनी कुडलेला त्याच्या राहत्या घराच्या परिसरातून सापळा रचून पकडले आहे.
अधिक तपास कोथरुड पोलीस (Kothrud Police) करत आहेत.

Web Title : Pune Crime | In Kothrud area, Tadipar goons attacked a youth and looted Rs 25,000, arrested by police

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Reserve Bank of India | डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना RBI कडून रद्द; खातेदारांना पैसे काढता येणार नाहीत

Gold Price Today | आज 7921 रुपयांनी सोनं स्वस्त, स्वस्त सोनं खरेदीची उद्यापर्यंत संधी, जाणून घ्या आजचे बाजारभाव

Pune News | टुव्हीलरवरून एक नाही तर तब्बल 6 जणांचा प्रवास; पोलीस देखील चक्रावले

Night Cream | घरच्या घरी नाईट क्रीम कशी तयार करावी? सावळी त्वचा देखील गोरी होईल; जाणून घ्या