Pune Crime | एकाच दिवसात 9 जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार दीड तासात हडपसर पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरात एकाच दिवसात 9 जबरी चोरीचे (Robbery) गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Criminal) हडपसर पोलिसांनी अवघ्या दीड तासात मुद्देमालासह अटक केली. ओंकार विनोद मासाळ उर्फ हर्षद सलीम शेख (Omkar Vinod Masal alias Harshad Salim Sheikh) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार आशिष उर्फ गुड्डु (Ashish alias Guddu) हा फरार झाला आहे. आरोपींनी गुरुवारी एकाच दिवसात 9 ठिकाणी जबरी चोरीचे गुन्हे (Pune Crime) केले होते.

 

गुरुवारी (दि.5) रात्री साडे दहाच्या सुमारास आकाशवाणी हडपसर येथे काही तरुण लोकांना लुबाडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काही वेळातच दोन ते तीन जणांनी आकाशवाणी परिसरात डिओ गाडीवरुन आलेल्या दोन जणांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल व इतर वस्तू चोरून नेल्याची तक्रार केली. त्यापैकी एका फिर्यादीच्या छातीत चाकू भोसकून जखमी केले होते. तर दुसऱ्याच्या खांद्यावर जमा आढळून आले. (Pune Crime)

पोलिसांनी डीओ गाडीचा शोध घेत असताना शुक्रवारी (दि.6) तपास पथकातील (Investigation Team) पोलीस नाईक शशिकांत नाळे (Police Naik Shashikant Nale) यांना काळ्या रंगाच्या डिओवरील दोन जण एका रिक्षाचालकास चाकूचा धाक दाखवून लुटत असल्याचे दिसले. तसेच आरोपींनी रिक्षा चालकावर वार केल्याचे दिसून आले. नाळे यांनी आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या झटापटीत एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. तर एकाला ताब्यात घेतले.

 

पोलिसांनी आरोपीकडे असलेल्या गाडीची डिकी तपासली असता त्यामध्ये 9 मोबाईल फोन आढळून आले. पोलिसांनी ओंकार विनोद मासाळ उर्फ हर्षद सलीम शेख (वय-22 रा. जुना बाजार मंगळवार पेठ पुणे) याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने सांगितले की, गुरुवारी (दि.5) कोंढवा येथून संध्याकाळी 7 वाजता सुरुवात करुन चंदननगर व हडपसर परिसरात साथिदार आशिष उर्फ गुड्डु (रा. रामटेकडी) याच्या मदतीने लोकांना चाकूचा धाक दाखवून तसेच चाकूने वार करुन त्यांच्याकडील मोबाईल, चैन, पाकीट चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपींनी एकाच दिवसात कोंढवा (Kondhwa Police Station), चंदननगर (Chandan Nagar Police Station), हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत 9 जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. हडपसर पोलिसांनी दीड तासात आरोपींना पकडून मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी कोंढवा परिसरात -2, चंदननगर 2 आणि हडपसर परिसरात 5 गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपी ओंकार मसाळ हा पोलीस रेकॉडवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी वानवडी (Wanwadi Police Station),
हडपसर, लोणीकंद (Lonikand Police Station), मुंढवा (Mundhwa Police Station), खडक (Khadak police station),
फरासखाना (Faraskhana Police Station), मार्केटयार्ड (Marketyard Police Station), जामखेड (Jamkhed Police Station),
अहमदनगर (Ahmednagar Police Station) पोलीस ठाण्यात 16 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (Addl CP Namdev Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे (Senior Police Inspector Arvind Gokule),
पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे (Police Inspector Vishwas Dagle) यांच्या सूचनेनुसार
सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijaykumar Shinde), पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे (PSI Avinash Shinde),
पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, अविनाश गोसावी, संदीप राठोड, अंकुश बनसुडे, समीर पांडुळे, शशिकांत नाळे,
सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे, सुरज कुंभार यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | In one and a half hours, a criminal who committed 9 thefts in a single day was caught by the Hadapsar police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा