Pune Crime | पुण्यात 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार करणार्‍या तरुणाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली (Pune Crime) आहे.

 

शुभम महेश काटे (वय २१, रा. पदमावती) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी या मुलीच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात Sahakarnagar Police Station (गु. र. नं. २७९/२१) फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या १४ वर्षाच्या मुलीशी काटे याने मागील दोन ते तीन वर्षांपासून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर पदमावती येथे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध केले. ही बाब शनिवारी तिच्या आईला समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक बुनगे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | In Pune, a 14 year old girl was raped on the pretext of marriage

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | विमान तिकीटाचे पैसे मागितल्यास आत्महत्या करुन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची ट्रॅव्हल्स कंपनी मालकाची धमकी

Mutual Funds SIP | ‘या’ ब्ल्यूचिप फंड्सने शानदार दिला रिटर्न; जाणून घ्या 5 वर्षात किती केली ‘कमाई’

Dilip Walse Patil | समीर वानखेडेंच्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेशी ‘जुजबी’ चर्चा; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले… (व्हिडिओ)

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; ‘द गेम चेंजर्स’ संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला