Pune Crime | पुण्यात लग्नास नकार दिल्याने सर्वांसमोर 35 वर्षाच्या महिलेचा फाडला गाऊन; पुढं झालं असं काही…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नास नकार दिल्याने अश्लिल शिवीगाळ करणार्‍याला महिलेने जाब (Pune Crime) विचारला. तेव्हा त्याने दारुच्या नशेत सर्वांसमोर महिलेचा गाऊन फाडून विनयभंग (Molestation) केला.

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (wanwadi police) विकी जगदीश साळवी (वय 35, रा. वानवडी) याला अटक (Arrest) केली आहे. याप्रकरणी एका 35 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपीला लग्नास नकार दिला आहे. त्यामुळे आरोपी हा फिर्यादीला वारंवार शिवीगाळ करुन अश्लील शेरेबाजी करत असतो.

याचा कडेलोट शनिवारी सायंकाळी झाला. विकी दारुच्या नशेत आला व त्याने या महिलेला पुन्हा सर्वांसमोर शेरेबाजी सुरु केली.
तेव्हा या महिलेने त्याला तु मला सारखी शिवीगाळ का करतोस, तुझा माझा काय संबंध, असे विचारले.
तेव्हा त्याने सर्वांसमोर फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन त्यांचा गाऊन फाडून विनयभंग केला. पोलिसांनी विकी साळवी याला अटक केली आहे.

Web Titel :- Pune Crime | In Pune, a 35-year-old woman was torn to pieces for refusing to get married; Something happened next …

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | किरकोळ वादातून निगडीत 5 जणांकडून एकाचा खून

BJP Former Minister Suicide | भाजपच्या माजी मंत्र्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं प्रचंड खळबळ

Digital Life Certificate | 1 ऑक्टोबरपासून लागू होतोय पेन्शनसंबंधी ‘हा’ खास नियम, तुम्हाला काय करावे लागेल ते जाणून घ्या