Pune Crime | पुण्यात पैशाच्या वादातून गर्लफ्रेंडवर चॉपरने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जेवणाच्या बहाण्याने गर्लफ्रेंडला (girlfriend) फार्महाऊसवर नेऊन तिच्यावर चॉपरने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सासवड रस्त्यावरील (Saswad Road) एका फार्महाऊसवर घडली आहे. बॉयफ्रेंडने आपल्याच गर्लफ्रेंडवर वार केल्यामुळे पुण्यात (Pune Crime) खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa police) तरुणाला अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने पैशांच्या वादातून वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.

आरिफ इसाक शेख Arif Isaac Sheikh (वय-29 रा. ताडीवाला रस्ता, पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरिफने पैशाच्या वादातून गर्लफ्रेंडच्या गळ्यावर, मानेवर, हातावर आणि दंडावर चॉपरने सपासप वार केले. याप्रकरणी तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) फिर्याद दिली आहे. आरिफ आणि फिर्यादी तरुणी यांच्यामध्ये प्रेमसंबंध आहेत. काही दिवसांपूर्वी तरुणीने आरोपी आरिफला पैसे दिले होते. या पैशाच्या वादातून आरिफने फिर्यादीवर वार केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने आरोपी आरिफला दिलेले पैसे परत मागितले. अनेकवेळा पैशांची मागणी करुन ही त्याने पैसे परत केले नाहीत. त्यामुळे फिर्यादी तरुणीने त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला होता. 16 ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारस आरिफने फिर्यादी तरुणीला जेवण करण्याच्या बहाण्याने सासवड रोडवरील एका फार्महाऊसवर घेऊन गेला. त्याठिकाणी या दोघांमध्ये पैशावरून वाद झाले. याचा राग आल्याने आरोपीने तिच्यावर चॉपरने सपासप वार केले.

आरीफ चॉपरने वार करत असताना फिर्यादी यांनी त्याची माफी मागून पुन्हा पैसे मागणार नाही, असे सांगितले.
मात्र संतापलेल्या आरोपीने तिच्यावर वार केले. त्यानंतर त्यानेच तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे आरीफच्या विरोधात तक्रार दिली.
तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.
चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील (PSI Swapnil Patil) करीत आहेत.

Web Titel :- Pune Crime | In Pune, a chopper attacked his girlfriend over a money dispute

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Navale Bridge Accident | दुर्देवी ! पुण्यातील नवले ब्रीजवर टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत महिलेचा मृत्यू, नात जखमी

Javed Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू हिंदूच’, BJP आरएसएससंबंधी ‘त्या’ वादावर ‘जावेद अख्तर’ याचं रोखठोक मत, म्हणाले…

Pune Rains | पुण्यासह पालघर, नाशिकमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता