Pune Crime | कोंढव्यात पतीने पत्नीला चौथ्या मजल्यावरुन ढकलले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यामध्ये पतीने पत्नीला चौथ्या मजल्यावरुन ढकलून (Husband and Wife) दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) कोंढवा परिसरात घडली असून याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक (Arrest) केली आहे. इमारतीच्या सुपरवायझर सोबत पत्नीने भांडण केले नसल्यामुळे संतापलेल्या पतीने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) पती विरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

 

 

नितीन दशरथ दहिरे Nitin Dashrath Dahire (वय-32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात 25 वर्षीय पत्नीने तक्रार (FIR) दिली आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला आहे. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातमध्ये एका निर्माणधीन इमारतीत फिर्यादी या पतीसोबत राहतात. या ठिकाणी लाईट फिटिंगचे (Light Fitting) काम सुरु आहे. (Pune Crime)

 

 

काही दिवसांपूर्वी नितीन दहिरे याचे लाईट फिटिंग करण्यासाठी आलेल्या सुपरवायझर (Supervisor) सोबत भांडण झाले होते.
त्यावेळी पत्नीने आपली बाजू घेऊन सुपरवायझर सोबत भांडण केले नसल्याचा राग त्याच्या मनात होता. याच कारणावरुन त्यांच्यामध्ये शनिवारी भांडण झाले.
हे भांडण एवढे विकोपाला गेले की, पतीने रागाच्या भरात पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण (Beating) केली.
एवढेच नाही तर चौथ्या मजल्यावरुन (Fourth Floor) लिफ्टसाठी सोडलेल्या मोकळ्या जागेतून खाली ढकलून दिले. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | in pune a husband pushed his wife from the fourth floor if you read the reason you will be annoyed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Malegaon Bomb Blast Case | मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्याची संशयित आरोपी समीर कुलकर्णीची मागणी, खटल्याचे कामकाज लांबविल्याचा आरोप

 

Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, द क्रिकेटर्स क्लब संघांचा दुसरा विजय

 

National Pension Scheme | पत्नीला बनवा आत्मनिर्भर, उघडा ‘हे’ अकाऊंट; दरमहिना मिळतील 45 हजार रुपये, जाणून घ्या