×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | पुण्यात प्रेम प्रकरणातून भरदिवसा अल्पवयीन मुलाचा खून, प्रचंड खळबळ

Pune Crime | पुण्यात प्रेम प्रकरणातून भरदिवसा अल्पवयीन मुलाचा खून, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वडगाव बुद्रुक (Vadgaon Budruk) परिसरात मैत्रिणीसोबत गप्पा-गोष्टी करत बसलेल्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून खून (Murder In Pune) झाल्याची घटना आज (रविवार) भरदिवसा दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. सिंहगड रोड पोलिस (Sinhagad Raod Police Station) ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आता गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. (Pune Crime)

 

नागेश सिध्दाप्पा चिंचोळे (17, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चिंचोळे नागेश हा परिसरातील पाऊंजाई मंदिरामागील घुले नगर (Ghule Nagar, Pune) भागात असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये मैत्रिणीसह गप्पा-गोष्टी करत बसला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात बिअरची बाटली आणि रोपटे असलेली कुंडी घातली. रक्ताच्या थारोळ्यात नागेश जमिनीवर गंभीर जखमी अवस्थेत पडला. गंभीर जखमी झाल्याने तो जागेवरच मयत झाल्याची माहिती समोर येत आहे (Pune Crime). हल्लेखोर काम तमाम करून पसार झाले आहेत. दरम्यान, प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

 

भरदिवसा अल्पवयीन मुलाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिस हल्लेखोराच्या मागावर असून आरोपींना लवकर अटक करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

 

Web Title :- Pune Crime | In Pune, a minor boy was killed in broad daylight due to a love affair in the area, huge excitement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

S. Jaishankar | युद्धात भारत कोणाच्या बाजूने?, संयुक्त राष्ट्राच्या महासभेत एस. जयशंकर यांनी दिले ‘हे’ उत्तर

IND vs ENG | भारताच्या दीप्ती शर्माने चेंडू न टाकताच घेतली विकेट

CM Eknath Shinde | ते बंड फसले कारण त्यावेळी अजित पवार होते, यावेळी…, एकनाथ शिंदे यांनी सांगितला फरक

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News