Pune Crime | पुण्यात पोलिसांच्या ‘खबर्‍या’ समजून तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार ! खडकी पोलिसांकडून एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | पोलिसांचा खबर्‍या असल्याने समजून तिघांनी एका तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार (Pune Crime) करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadki Police Station) कझम ऊर्फ कझमफर हुमायुन इराणी (वय ३५, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) याला अटक केली आहे.

त्याचे साथीदार सय्यद नूर जानशा इराणी (वय ५२) आणि रुकसाना सय्यदनूर इराणी (वय ४५) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी हैदर शौकत शेख (वय २०, रा. महात्मा गांधी वसाहत, पाटकर प्लॉट, पाटील इस्टेटसमोर) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (गु. र. नं. ३१२/२१) फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

फिर्यादी हे मंगळवारी दुपारी त्यांचे आजीच्या दुकानात जात होते.
त्यांच्या वस्तीमध्ये राहणार्‍या आरोपी कझम इराणी याने त्याची व त्याच्या नातेवाईकांची खबर पोलिसांना देतात.
असे समजून फिर्यादीला पकडले. सय्यद व रुकसाना यांनी हाताने मारहाण केली.
कझम याने फिर्यादीच्या गळ्यावर चाकूने वार केला.
तसेच वस्तीतील लोकांवर चाकू व कोयता उगारुन दहशत निर्माण केली म्हणून गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | In Pune, a young man was stabbed in the neck after understanding the news of the police! One arrested by Khadki police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | धक्कादायक ! घरी बोलावून एक्स बॉयफ्रेंडने प्रेयसीची केली क्रुर पद्धतीने हत्या; सपासप 7 वार करुन केलं रक्तबंबाळ, अन्…

Thane Gang Rape | नराधम प्रियकराने प्रेयसीला केलं मित्रांच्या स्वाधीन, ठाण्यात चौघांकडून 26 वर्षीय युवतीवर कारमध्ये आळीपाळीनं बलात्कार

Rajesh Tope | ‘दुसरी लाट ओसरलेली नाही, दिवाळीनंतर कोरोना वाढण्याची शक्यता’ – आरोग्य मंत्री राजेश टोपे