Pune Crime | पुण्यात आकडे टाकून वीज चोरीला अटकाव करणार्‍या कर्मचार्‍याला मारहाण

पुणे : Pune Crime | वीज वाहिनीवर आकडे टाकून त्यातून वीज चोरुन ती व्यवसायासाठी वापरण्याचा प्रकार ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चालतो. बारामती (Baramati) तालुक्यातील सावळ गावातील आटोळे वस्तीत अशाच प्रकारे वीज वाहिनीवर आकडे टाकून फॉबिकेशनचा व्यवसाय सुरु होता. ही वीज चोरी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या  महावितरणच्या कर्मचार्‍याला तिघांनी त्याच आकड्याने मारहाण करण्याचा प्रकार समोर आला (Pune Crime) आहे.

याप्रकरणी महावितरणचे कर्मचारी प्रमोद नांगरे (वय २५) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात (Baramati Taluka Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यावरुन आस्लम मण्यार, सोमनाथ हनुमंत जगताप (रा. सावळ, ता. बारामती) आणि एका अनोळखी माणसावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल (Pune crime) करण्यात आला आहे.

प्रमोद नांगरे हे वीज बील थकबाकी वसुलीसाठी मंगळवारी सकाळी सावळ गावात गेले होते.
गावातील आटोळे वस्ती येथील वीज वाहिनीच्या दोन खांबावर आकडे टाकून वीज चोरी केली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्याद्वारे फॉबिकेशनचे काम सुरु होते. नांगरे यांनी त्याला अटकाव केल्यावर आरोपींनी फिर्यादी यांची कॉलर पकडली.
हाताने मारहाण करुन धक्काबुक्की केली़ मण्यार यांच्याकडे वेल्डिंगचे काम करण्यासाठी आलेल्याने फिर्यादी कट करीत असलेल्या आकड्याच्या वायरने पोटरीवर मारुन जखमी केले.

हे देखील वाचा

Solapur Crime | पुण्यातील ‘विवाहित’ प्रेमी युगुलाची सोलापूर जिल्ह्यातील लॉजवर आत्महत्या; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुण्यातील ‘त्या’ कार्यकर्त्याला पश्चिम बंगाल हिंसाचार प्रकरणी सीबीआयने केली अटक

BJP-MNS Alliance | ‘या’ 4 निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युती होणार? शिवसेनेची चिंता वाढली?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | In Pune, an employee who was trying to prevent power theft by throwing numbers was beaten

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update