पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दर महा 10 हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी करुन दुकानदाराला कोयत्याने मारहाण करुन खिशातील 2 हजार रुपये जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याप्रकरणी सौरभ मुरकुटे (वय 21, रा. पिंपळे निलख) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात chaturshringi police station (गु. र. नं. 440/21) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकाश ऊर्फ सोन्या संजय क्षीरसागर (रा. पिंपळे गुरव), बाबा शेख (रा. सांगवी), अनिल गायकवाड (रा. खडकी – Khadki), स्वप्नील पालके (रा. औंध- Aundh) यांच्याविरुद्ध 392, 397, 394, 387, 323, 504, 506,/2, 507, 34 सह आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ मुरकुटे यांचे औंध गावात (Aundh) अंडा विक्रीचे दुकान आहे.
सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ते दुकान बंद करुन जात असताना त्यांच्या ओळखीच्या आरोपींनी त्यांना गाठले. 10 हजार रुपये हप्ता देण्याच्या कारणावरुन फिर्यादी यांना लोखंडी कोयता, लोखंडी गज, दांडके यांचा धाक दाखवून मारहाण (Pune Crime) करुन त्यांच्या शर्टच्या खिशातील 2 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यांच्या मदतीसाठी येणार्या लोकांना धमकावून परिसरात दहशत निर्माण केली आहे.
Web Title :- Pune Crime | In Pune, the ransom was boiled down by beating the shopkeeper for paying the installment; Incidents in the chaturshringi area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Price Today | सोन्याच्या किंमती पुन्हा घसरण; जाणून घ्या लेटेस्ट दर