×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | 'त्या' प्रकरणात बारामतीचे तत्कालीन DySP नारायण शिरगावकर आणि पो....

Pune Crime | ‘त्या’ प्रकरणात बारामतीचे तत्कालीन DySP नारायण शिरगावकर आणि पो. नि. भाऊसाहेब पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; सध्या पुणे शहर गुन्हे शाखेत कार्यरत असलेले ACP शिरगावकार म्हणाले….

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या बारामती विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक आणि सध्या पुण्याच्या गुन्हे शाखेत सहायक पोलीस आयुक्त (Pune ACP) म्हणून कार्यरत आसलेले नारायण शिरगावकर (Deputy Superintendent of Police in Pune Rural Narayan Shirgaonkar) यांच्यासह दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा (FIR) दाखल करण्याचे आदेश दौंड न्यायालयाने  (Daund Court) दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथील जमीन खरेदी विक्री गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने हे आदेश दिले आहे. नारायण शिरगावकर यांच्यासह यवत पोलीस ठाण्याचे (Yavat Police Station) तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील (Police Inspector Bhausaheb Patil), पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोपट उर्फ कैलास तावरे (Parrot alias Kailash Tower) यांच्या विरोधात गुन्हा दाखल ( Pune Crime) करण्याचे आदेश दौड न्यायालयाचे न्यायाधीश जे.एस. खेडकर- गोयल (Judge J.S. Khedkar- Goyal) यांनी दिले आहेत. यामुळे पोलीस विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिरगावकर यांनी याबाबत पोलीसनामा ऑनलाइनकडे काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

तक्रारदार किरण भोसले (Kiran Bhosle) व आरती लवटे (Aarti Lovete) यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे, त्यांनी पोपट उर्फ कैलास तावरे यांचे विरुद्ध व इतर लोकांचे विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे तक्रारी दाखल केलेल्या होत्या. परंतु सदर तक्रारीची सुरुवातीला दखल घेतली गेली नाही. त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर पोपट तावरे व इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु त्यानंतर  तपासामध्ये पोपट तावरे याला वर तीनही आरोपींनी मदत करून आरोपी विरुद्ध पुरावा नसल्याने (Clean Chit) त्याचे विरुद्ध दोषारोप पत्र (Charge sheet) दाखल केले नाही, असा अहवाल न्यायालयात सादर केला. ( Pune Crime)

पोलिसांनी न्यायालयात सादर केलेला अहवाल तक्रारदार यांना मान्य नसल्यामुळे त्या विरोधात तो ना मंजूर व्हावा याकरिता तक्रारदार यांनी अर्ज केला.
तसेच प्रथमदर्शनी या तीनही आरोपींनी पुरावा असताना देखील आरोपी पोपट तावरे याला मदत करण्याकरता जाणून-बुजून खोटा अहवाल पाठवणे तसेच फिर्यादी यांची फसवणूक (Fraud) करणे त्यांच्या कर्तव्यात फौजदारी स्वरूपाची कर्तव्य कसूर करणे या व अशा कारणास्तव न्यायालयामध्ये तक्रारदार यांनी अ‍ॅड. राजेश काटोरे (Adv. Rajesh Katore) व अ‍ॅड. अमीत काटे (Adv. Amit Kate) यांचे मार्फत तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीवर युक्तिवाद होऊन व युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीने प्रथम दर्शनी गुन्हा केलेला असल्याचे निष्कर्ष
नोंदवून न्यायालयाने यांच्यावर आयपीसी 420, 464, 120ब, 192, 196 अशा विविध गंभीर कलमानुसार गुन्हा
दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, बारामतीचे तत्कालीन उप अधीक्षक / उप विभागीय पोलीस अधिकारी आणि सध्या पुण्याच्या गुन्हे शाखेत
सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले नारायण शिरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी
सदरचे प्रकरण यवत पोलीस स्टेशनचे आहे. त्या संदर्भात यवत पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.
यवत पोलीस स्टेशन माझ्या (बारामती उप विभाग, पुणे ग्रामीण) अंतर्गत कधीच नव्हते तसेच यवत पोलीस स्टेशन
ज्या विभागात आहे त्या विभागाचा अतिरिक्त कार्यभार माझ्याकडे कधीच नव्हता.
त्या प्रकरणाच्या तपासाचा माझा काहीही संबंध नाही. त्यामुळे या संदर्भात मी न्यायालयात अपील केले आहे.

Web Title :- Pune Crime | In ‘that’ case Court order to file a case against Former DySP of Baramati Narayan Shirgaonkar and police inspector Bhausaheb Patil; ACP Shirgaonkar currently working in Pune City Crime Branch said….

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pankaja Munde | … तर मोदीही माझं राजकारण संपवू शकत नाहीत, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

Chandrakant Patil | विद्यार्थी हितासाठी सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे, चंद्रकांत पाटलांचे निर्देश

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News