×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! सराईत...

Pune Crime | गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! सराईत गुन्हेगाराकडून 5 पिस्टल व 11 काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने (Crime Branch Unit Two) दोन आरोपींना अटक (Arrest) करुन त्यांच्याकडून पिस्टल (Pistol), काडतुसे (Cartridge),आणि खाली मॅगझीन असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींकडून एकूण 5 पिस्टल, 3 खाली मॅगझीन आणि 11 काडतुसे जप्त केली आहेत. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने मोठी कारवाई (Pune Crime) केली आहे.

 

स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी 13 ऑगस्ट रोजी कोम्बिंग ऑपरेशन केले होते. त्यावेळी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने आकाश प्रकाश जाधव (वय – 23 रा. भिलारेवाडी, कात्रज) याला ताब्यात घेऊन 55 हजार 200 रुपयांचे पिस्टल मॅगझीनसह, एक खाली मॅझीन आणि एक जिवंत काडतुस जप्त (Pune Crime) केले होते. परराज्यातून मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेल्या पिस्टल पैकी एक पिस्टल आकाश जाधव याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी आकाश जाधव याची पोलीस कोठडी दरम्यान सखोल चौकशी केली असता गुन्ह्यातील मुख्य आरोपी मजुम्मील हरुण बागवान (रा. श्रीरामपूर) याची माहिती पोलिसांना मिळाली. (Pune Crime)

पोलिसांनी मजुम्मील बागवान याला अटक करुन त्याची पोलीस कोठडी दरम्यान चौकशी केली. चौकशीत त्याने पिस्टल नातेवाईकांकडे ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांच्या घरातून 4 पिस्टल, 2 खाली मॅगझीन, 10 जिवंत काडतुसे जप्त केली. गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक करुन 5 पिस्टल, 3 खाली मॅगझीन आणि 11 जिवंत काडतुसे असा एकूण 2 लाख 47 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil),
सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले (API Vaishali Bhosle), विशाल मोहिते (API Vishal Mohite)
पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे (PSI Rajendra Patole)
पोलीस अंमलदार गजानन सोनुने, उज्वल मोकाशी, कादीर शेख, उत्तम तारु, संजय जाधव, समिर पटेल, साधना ताम्हाणे,
रेश्मा उकरंडे, निखिल जाधव, मोहसिन शेख, गणेश थोरात, प्रमोद कोकणे, शंकर नेवसे, राहुल राजपुरे, नागनाथ राख यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | In the background of the pune Ganesh festival pune police crime branchs big action 5 pistols and 11 cartridges seized from criminal

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News