Pune Crime | पुण्याच्या कोंढवा परिसरात तरुणावर कोयत्याने सपासप वार, प्रकृती चिंताजनक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर सपासप वार (Pune Crime) केल्याची धक्कादायक घटना आज (गुरुवार) घडली आहे. ही घटना कोंढव्यातील अनुकूलनगरमध्ये (Pune Crime) घडली आहे. घडनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस ठाण्यातील (kondhwa police station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कार्तिक जाधव (Kartik Jadhav) (वय 22) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. जुन्या वादातून टोळक्याने कार्तिक याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आणि काही सराईत गुन्हेगारांची भांडणे झाली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. याच रागातून आरोपींनी आज (शुक्रवारी) संध्याकाळी सहाच्या सुमारास कार्तिकला कोंढव्यातील अनुकूलनगरमध्ये त्याला गाठले.

टोळक्याने जुन्या वादातून कार्तिक याच्यावर कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले.
त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी कार्तिकला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
कार्तिक याला कोयत्याचे वर्मी घाव लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.

Web Title :- pune crime | In the Kondhwa area of ​​Pune, a young man was stabbed with a scythe, his health was critical

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात महिलेचा खून करुन मृतदेह फेकला नदीत

Pimpri Crime | हॅलो… मी शरद पवार बोलतोय, पैसे देऊन प्रकरण संपवून टाक !, शरद पवारांचा आवाज काढून खंडणी मागणाऱ्यावर FIR

Minister Nawab Malik | ‘केंद्राकडून राज्याला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत’