Pune Crime | पुण्यातील पर्वती दर्शन परिसरात भरदिवसा मानेला कोयता लावून सराईत गुन्हेगाराने तरुणाला लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आजारी मित्राला भेटायला जाणार्‍या तरुणाला सराईत गुन्हेगाराने अडवून त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्याने त्याने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. तो चुकविताना तो खाली पडला तेव्हा त्या गुन्हेगाराने भर रस्त्यात त्याच्या डोक्यावर पाय देऊन मानेला कोयता लावला. त्यांच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. दत्तवाडी पोलिसांनी खूनाचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल करुन या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला (Pune Criminals) अटक केली.

 

 

साहिल पटेल (वय १९, रा. पर्वती दर्शन – Parvati Darshan) असे या अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी अजय शिवप्रसाद परदेशी (वय २९, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे.

 

फिर्यादी हे शनिवारी सकाळी आपल्या आजारी मित्राला भेटायला जात होते.
त्यावेळी आंबेडकर वसाहत (Ambedkar Wasahat) येथे साहिल पटेल थांबला होता.
त्याने माझ्याकडे काय पहातो, असा बहाणा करुन त्यांच्या खिशातून २ हजार रुपये काढून घेऊ लागला.
तेव्हा परदेशी याने विरोध केला. तेव्हा त्याने कंबरेला लावलेला धारदार कोयता काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर मानेवर जोरात फिरवला.
तो चुकविताना फिर्यादी खाली पडले. तेव्हा पटेल याने त्यांच्या डोक्यावर पाय देऊन मानेवर कोयता ठेवला.
त्यांच्या खिशातून २ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
त्यावेळी परदेशी यांनी आरडाओरड करुन मित्रास बोलावले असताना आरोपीने त्याच्या अंगावर धावून जाऊन त्याला तोडून टाकण्याची धमकी (Pune Crime) दिली. पोलिसांनी साहिल पटेल याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक लोहार (PSI Lohar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | In the Parvati Darshan area of ​​Pune, a young man robbed a young man by stabbing him in the neck all day long dattawadi police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kapil Sharma Show | विकी-कतरिनाच्या लग्नाची अक्षय कुमारने घेतली चुटकी, म्हणाला – ‘किटकॅट खाल्ला असेल…’

Kangana Ranaut | कंगनाच्या प्रेमात अडकला ‘हा’ अभिनेता देऊ शकतो पत्नीला घटस्फोट!

Gopichand Padalkar | बहुजनांना एकत्रित आणण्यासाठी पुण्यात ‘मल्हार महोत्सव 2022 ‘चे आयोजन; गोपीचंद पडळकरांनी दिली माहिती

Omicron Covid Variant | पाय पसरतोय ओमिक्रॉन ! पुण्याच्या जुन्नरमधील 5 वर्षाच्या मुलासह महाराष्ट्रात 6 नवीन केस, देशात आतापर्यंत 151 प्रकरणे

New Debit-Credit Card Rules | 1 जानेवारीपासून लागू होतील क्रेडिट-डेबिट कार्डचे नवीन नियम, तुम्हाला कसे करतील प्रभावित, जाणून घ्या