Pune Crime | भर रस्त्यात महिलेने स्वत:चा टॉप फाडून केली महिला पोलिसांना मारहाण; वडगावशेरी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर आरडाओरडा करीत नागरिकांना शिवीगाळ करणाऱ्या महिलेला समजावून सांगणार्‍या महिला पोलिसांना (Pune Police) मारहाण (Beating) करुन एका महिलेने भर रस्त्यात स्वत:च्या अंगावरील टॉप फाडला. हा प्रकार वडगावशेरी येथील रामचंद्र कार्यालयासमोर शुक्रवारी (Pune Crime) मध्यरात्री घडला.

 

याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका 28 वर्षाच्या महिलेवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यातील (Vimantal Police Station) महिला पोलीस शिपाई यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला वडगाव शेरी येथील रामचंद्र कार्यालयासमोर रोडवर आरडाओरड करुन रस्त्यावरुन जाणार्‍या येणार्‍या नागरिकांना मोठ मोठ्याने शिवीगाळ करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
महिला मार्शल या घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी या महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
या महिलेला रोडच्या बाजूला घेत असताना तिने स्वत:च्या अंगावरील टॉप फाडला.
महिला पोलीस शिपाई यांना हाताने मारहाण करुन त्यांचा चष्मा तोडून उजव्या हाताचे
अंगठ्याजवळील बोटास चावा घेऊन जखमी करुन ते करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक मुळुक (PSI Muluk) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | In the street, a woman tore her own top and beat up a female lady police officer; Incidents in Wadgaon Sheri area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bullet Train | महाराष्ट्रात सरकार बदलल्याने ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाचा वेग वाढणार, अडथळे होणार दूर

 

Uddhav Thackeray | शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा मोठा निर्णय ! आता शिवसैनिकांना द्यावे लागणार एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र

 

Maharashtra Rain Update | मुंबईसह परिसरात जोर’धार’ ! आगामी 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

 

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, पाहा व्हायरल फोटो…