Pune Crime | अप्पर इंदिरानगरमध्ये टोळक्यांचा पुन्हा धुडगुस ! 3 टेम्पो, 2 रिक्षा, कार, दुचाकीच्या काचा फोडून माजविली दहशत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपल्या टोळीची दहशत माजविण्यासाठी रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्यांना लक्ष्य करण्याचे प्रकार शहरात वारंवार घडताना दिसत आहे. अप्पर इंदिरानगर (Upper Indiranagar) येथील चैत्रबन वसाहतीत (Chaitraban Society) टोळक्यांनी धुडगुस घालत टेम्पो, रिक्षा, कार, दुचाकी यांच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime)

 

याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police Station) श्रीकांत नेटके (रा. राजीव गांधीनगर, बिबवेवाडी), चिराग अंगुरडे, सल्या ऊर्फ साहिल कलादगी, आकाश अवघडे, अक्षय शिरसाट, प्रज्वल जाधव, रोहन तोबरे व त्यांच्या दोन ते तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी काशीनाथ निंगदळे (वय ४२, रा. चैत्रबन वसाहत, अप्पर बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. आपल्या टोळीची दहशत पसरविण्यासाठी श्रीकांत नेटके व त्याच्या साथीदारांनी हातात कोयते व लाकडी बांबु घेऊन चैत्रबन वसाहत अप्पर डेपोकडे जाणार्‍या रोडच्या कडेला व सरगम चाळ (Sargam Chaal) येथे पार्क केलेला फिर्यादी यांचा पॅगो टेम्पोची पुढील काच फोडली. तसेच आणखी २ टेम्पो़ २ रिक्षा व एक कार, एक दुचाकी अशा ७ वाहनांची तोडफोड केली. हवेत कोयते फिरवून “आम्ही इथले भाई आहे, हा आमचा एरिया आहे. मध्ये कोण पडल्यावर एक एकाला जिवंत सोडणार नाही,” असे म्हणून परिसरात दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक काळुखे (API Kalukhe) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | In Upper Indiranagar the mobs are being harassed again 3 tempos 2 rickshaws cars two wheeled glass shattered

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा