Pune Crime | पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात काकानेच केले भाचीसोबत अश्लिल चाळे, विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात (Pune Crime) महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यातील (Pune Crime) विश्रांतवाडी परिसरात 50 वर्षाच्या काकानेच आपल्या अल्पवयीन भाचीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मागील वीस दिवसांपासून ते बुधवार (दि.20) या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi police) आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

 

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने (वय-37) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi police station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा मावस दिर आहे.
पीडित मुलगी दुकानात जात असताना आरोपीने तिला जवळ बोलावून घेत तिच्यासोबत अश्लील चाळे केले.
तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी (Pune Crime) दिली.

 

याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी जाब विचारला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केली.
तसेच पीडित मुलीकडे पाहून अश्लील हातवारे करुन चुंबन देण्याचा इशारा करुन विनयभंग केला.
आरोपी विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत (Pocso Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | In Vishrantwadi area of ​​Pune, uncle committed indecency with his niece and filed a case of molestation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Fixed Deposit | बँकेत FD करण्याचा विचार करत असाल तर ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा, होईल जास्त फायदा

Ananya Pandey Chat With Aryan Khan | आर्यन खानने अनन्या पांडेकडून मागवला होता गांजा? NCB सोर्सचा दावा, चॅटमध्ये लिहिले होते – ‘व्यवस्था करेन’

Pune Crime | पुण्यात भरदिवसा बेछुट गोळीबार; वाळू व्यावसायिक संतोष जगतापसह दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक (व्हिडीओ)

Multibagger Stock | ‘या’ शेयरने गुंतवणुकदारांना दिला ‘विक्रमी’ रिटर्न, 1 लाखाचे झाले 12 लाख रुपये, जाणून घ्या पुढे कशी असेल वाटचाल?